Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सेटवर जेवणात भेदभाव केला जायचा, पुढे अक्षय कुमारने..."; अभिनेते गोविंद नामदेव यांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:22 IST

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मानधनापासून ते वागणुकीपर्यंत अनेक स्तरावर भेदभाव होत असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. मात्र, आता ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी सेटवरील जेवणाच्या बाबतीत पाळल्या भेदभाव पद्धतीवर खळबळजनक खुलासा केला आहे.

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मानधनापासून ते वागणुकीपर्यंत अनेक स्तरावर भेदभाव होत असल्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. मात्र, आता ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनी सेटवरील जेवणाच्या बाबतीत पाळल्या जाणाऱ्या 'फूड हायब्रिड' (विशिष्ट समूहासाठी असलेला जेवणाचा दर्जा) पद्धतीवर खळबळजनक खुलासा केला आहे. पूर्वी सेटवर मुख्य कलाकार आणि सह-कलाकारांच्या जेवणात मोठी तफावत असायची. त्यावेळी अक्षय कुमारने काय केलं, याचा खुलासा गोविंद यांनी केला आहे.

'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव यांनी जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "पूर्वी फिल्म सेटवर जेवणाच्या बाबतीत खूप वाईट पद्धत होती. सिनेमातील मुख्य नायकासाठी पंचपक्वान्नांचे ताट असायचे, दुय्यम भूमिका करणाऱ्या कलाकारांना थोडं कमी दर्जाचं जेवण दिले जायचे आणि ज्युनियर आर्टिस्टना तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण मिळायचे. एकाच सेटवर काम करूनही लोकांच्या जेवणात हा भेदभाव पाहून मनाला खूप वेदना व्हायच्या."

अक्षय कुमारचा 'तो' मोठा निर्णय

ही पद्धत बदलण्याचे श्रेय गोविंद नामदेव यांनी अक्षय कुमारला दिले आहे. त्यांनी सांगितले की, " पुढे अक्षय कुमारने आपल्या सेटवर मात्र ही प्रथा पूर्णपणे बंद केली. अक्षयचा नियम आहे की, सेटवर जो कोणी काम करत आहे, मग तो मुख्य अभिनेता असो, स्पॉटबॉय असो वा ज्युनियर आर्टिस्ट, सगळ्यांना एकाच दर्जाचे जेवण मिळेल. अक्षय स्वतःही त्याच रांगेत उभे राहून जेवण घेतो आणि सर्वांसोबत बसून जेवतो."

नामदेव यांच्या मते, अक्षय कुमारच्या या निर्णयामुळे फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या संस्कृतीत सकारात्मक बदल झाला आहे. जेव्हा एखादा मोठा सुपरस्टार स्वतः सर्वांसोबत बसून जेवण करतो, तेव्हा सेटवरील इतर कर्मचाऱ्यांसाठी ती सन्मानजनक गोष्ट असते आणि त्यामुळे कामात अधिक उत्साह येतो. अक्षयने केवळ शिस्तच नाही, तर सेटवर 'समानता' आणण्याचेही मोठे काम केले आहे, असेही नामदेव यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Govind Namdev reveals food discrimination on sets; Akshay Kumar intervened.

Web Summary : Govind Namdev exposed food disparities on film sets, where lead actors received better meals. Akshay Kumar ended this practice, ensuring equal food quality for everyone, fostering respect and boosting morale.
टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडटिव्ही कलाकारअक्षय कुमार