Dhurandhar 2 Actor Gaurav Gera Post: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या सिनेमाचा सध्या सगळीकडे बोलबाला पाहायला मिळतोय. अलिकडेच १९ मार्च रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून रणवीरच्या या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई कामगिरी करत इतिहास रचला आहे. अनेक बॉलिवूड प्रेमींसह इंडस्ट्रीतील कलाकार, दिग्दर्शक धुरंधर २चं भरभरुन कौतुक करत आहेत. या चित्रपटात रणवीरसह सारा अर्जुन तसेच राकेश बेदी, अर्जुन रामपाल, आर.माधवन यांसारखे तगडे कलाकार आहेत. याशिवाय चित्रपटात मोहम्मद आलम नावाचं पात्र साकारलेल्या अभिनेता गौरव गेरा देखील प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटातील त्याच्या या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक होताना दिसतंय.परंतु, त्याचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता.
नुकतीच अभिनेत्याने त्याच्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे चाहते भावुक झाले आहेत. गौरव गेरा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या दोन जुन्या पत्रांचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय,"मी हे पत्र माझ्या आई-वडिलांना ३ डिसेंबर, १९९८ रोजी लिहिलं होतं. मला मुंबईत येऊन महिनाही झाला नव्हता. आता मागे वळून पाहिलं तर वाटतं ही २८ वर्षे कशी उलटून गेली समजलंच नाही. तेव्हा ईमेल वगैरे असं काहीच नव्हतं, आम्ही फक्त पत्रांद्वारे संवाद साधायचो. त्यानंतरचा प्रवास खूप मोठा होता. टीव्ही, काही चित्रपट, जाहिरातपट, संगीत नाटके, रेडिओ, मग टिकटॉक आणि रील्स. आयुष्यात चढ-उतार होते, पण प्रवास सुंदर होता.देवाची कृपा सदैव अशीच राहो...".
त्यानंतर मग पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "धुरंधरनंतर पुढे काय होईल हे मला माहीत नाही. पण मला त्या २३ वर्षांपूर्वीच्या गौरवचे आभार मानायचे आहेत, ज्याने कधीही आशा सोडली नाही आणि माझ्या आई-वडिलांचे, ज्यांनी प्रत्येक पावलावर मला साथ दिली." अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने त्यांच्या संघर्षकाळातील आठवणी ताज्या केल्या आहेत. अशातच आता अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत.
Web Summary : Gaurav Gera, 'Dhurandhar 2' actor, shared an emotional post recalling his early struggles in Mumbai. He expressed gratitude to his parents for their unwavering support. His heartfelt journey resonates, earning praise and sparking nostalgia among fans.
Web Summary : 'धुरंधर 2' अभिनेता गौरव गेरा ने मुंबई में अपने शुरुआती संघर्षों को याद करते हुए एक भावुक पोस्ट साझा किया। उन्होंने अपने माता-पिता को उनके अटूट समर्थन के लिए आभार व्यक्त किया। उनकी कहानी प्रशंसकों के बीच प्रशंसा और पुरानी यादें ताजा करती है।