कपूर कुटुंबात सध्या लग्नाची गडबड सुरु आहे. करीना-करिष्माचा चुलत भाऊ आदर जैन (Aadar Jain)लग्नबंधनात अडकणार आहे. कालच त्याची रोका सेरेमनी पार पडली. यासाठी अख्खं कपूर कुटुंब पोहोचलं होतं. करीना सर्व पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी घेताना दिसली. तर दुसरीकडे करिष्मा कपूर (Karisma Kapoor) पापाराझींना पोज देत असताना अक्षरश: पडता पडता वाचली.
आदर जैन गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या रोका सेरेमनीसाठी कपूर कुटुंबातील अनेक सदस्य काल पोहोचले. करीना कपूर सुंदर डिझानयर साडीत दिसली. तर करिष्माने डिझायनर चुडीदार घातला होता. ती गाडीतून उतरली आणि पापाराझींना पोज देत होती. तोच ती अडखळली आणि पडता पडता वाचली. तिने स्वत:ला सावरलं आणि पापाराझींना व्हिडिओ टाकू नका म्हणाली. मात्र तोवर व्हिडिओ व्हायरल झाला होता असं पापाराझी तिला म्हणाले. तरी करिष्मा एकदम मजेशीर अंदाजात दिसत होती.
करीना-करिष्मासोबतच त्यांचे आईवडील बबिता आणि रणधीर कपूरही पोहोचले होते. तसंच रणबीर कपूर आई नीतू कपूरसोबत आला. आदर जैन आणि अलेखा हे वेडिंग कपल पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये होते. सोहळ्यात सर्व जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण होतं.
आदर जैन आधी अभिनेत्री तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. तारासोबत तो कपूर कुटुंबाच्या अनेक फंक्शन्सलाही दिसायचा. ताराच कपूर कुटुंबाची सून होणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र अचानक त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर काहीच महिन्यांनी आदर आणि अलेखा यांनी रिलेशनशिप जाहीर केली. अलेखा ही ताराची बेस्ट फ्रेंड होती.