Join us

आता कशी आहे ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची तब्येत? पत्नी हेमा मालिनींचा खुलासा, म्हणाल्या- "आम्ही वेळोवेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:08 IST

धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिंनीनी अपडेट दिली आहे

बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे ८९ वर्षांचे असूनही आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचे वय वाढले असले तरी, त्यांची ऊर्जा आणि काम करण्याची इच्छा आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटली. पण धर्मेंद्र यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी त्यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

धर्मेंद्र यांची तब्येत कशी आहे?

सोमवारी सकाळी हेमा मालिनी यांना मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्या गाडीतून उतरल्या आणि फोटोग्राफर्सना पाहताच हसल्या. पुढे त्या विमानतळाच्या दिशेने पुढे गेल्या. याच दरम्यान, पापाराझींनी त्यांच्याजवळ धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली. फोटोग्राफर्सनी जेव्हा हेमा मालिनी यांना विचारलं, “सर कसे आहेत मॅम आता?” तेव्हा हेमा मालिनींनी दोन्ही हात जोडून सांगितलं की, ''धर्मेंद्र आता आधीपेक्षा ठीक आहेत''. स्वतः हेमा मालिनींनी हे सांगितल्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

धर्मेंद्र यांचं वर्कफ्रंट

८९ व्या वर्षीही धर्मेंद्र यांनी अभिनयातून निवृत्ती घेतलेली नाही. ते आजही चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये सक्रिय आहेत. धर्मेंद्र यांच्या करिअरची खऱ्या अर्थाने दुसरी इनिंग सुरु झालीये असं म्हटल्यास वावगं ठरु नये. धर्मेंद्र यांना आपण 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात तसंच शाहिद कपूरच्या 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' या सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन यांच्या आगामी 'इक्कीस' सिनेमात खास भूमिकेत दिसणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Hema Malini reveals Dharmendra's health status, says he's doing better.

Web Summary : Hema Malini shared that Dharmendra's health is improving after his recent hospitalization for breathing issues. The veteran actor, despite being 89, remains active in films and web series, with recent appearances in 'Rocky Aur Rani Ki Prem Kahani'.
टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार