Bollywood Waqt Movie Song: होळीचा सण आणि बॉलिवूड सिनेमांचं खास नातं आहे. होळीचा रंग आणि त्यात आपल्या आवडत्या गाण्यावर थिकरण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. हिंदी चित्रपटांनी आपल्याला होळीची अनेक चांगली गाणी दिली आहेत. पण, प्रत्यक्षात चित्रपटांमध्ये अशा गाण्यांचं शूट करणं फार अवघड असतं. याचं उदाहरण म्हणजे अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांचा 'वक्त: द रेस अगेंस्ट टाईम्स' हा सिनेमा. २००५ मध्ये हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, प्रियंका चोप्रासह चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका होती. त्यावेळी हा चित्रपट 'लेट्स प्ले होली' या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आला होता. नेमकं हे काय घडलं होतं? जाणून घ्या.
मीडिया रिपोर्टनुसार, 'डू मी अ फेव्हर लेट्स प्ले होली' या गाण्याच्या शूटिंगसाठी जवळपास ७ दिवसांचा कालावधी लागला होता. अवघ्या सात मिनिटांच्या गाण्यासाठी सात दिवस लागल्याने या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन विपुल शाह यांनी केलं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
दरम्यान, त्यावेळी 'वक्त: द रेस अगेंस्ट टाइम' च्या सेटवर प्रियंका चोप्राचा अपघात झाला होता. होळीच्या गाण्याचं शूट करताना सर्वत्र पाणीच पाणी होतं. तेव्हा शूट करायला जात असताना प्रियंकाचा पाय विजेच्या तारेवर पडून अभिनेत्रीला करंट लागला होता. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती. त्यामुळे प्रियंकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रियंका चोप्रा पूर्णपणे बरी झाल्यानंतर मग या गाण्याचं शूट केलं गेलं, असं सांगण्यात येतं. परंतु जेव्हा 'डू मी अ फेव्हर लेट्स प्ले होली' हे गाणं रिलीज करण्यात आलं. तेव्हा ते गाणं सुपरहिट ठरलं होतं.