Join us

Cuteness Overloaded ! सौंदर्याच्या बाबतीत लेकीला टक्कर देतात ‘या’ अभिनेत्रींच्या मॉम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 08:00 IST

बॉलिवूड अभिनेत्री सुंदर आहेतच. पण त्यांच्या मॉमही कमी सुंदर नाहीत.

बॉलिवूड अभिनेत्री सुंदर आहेतच. पण त्यांच्या मॉमही कमी सुंदर नाहीत. लाईमलाइटपासून दूर राहणा-या या मॉम सौंदर्याच्या बाबतीत लेकींनाही टक्कर देतात. अशात काही सुंदर मॉमबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दीपिका पादुकोणची आई उज्ज्वला पादुकोणही कमालीची सुंदर आहे. आईसोबत दीपिका काही प्रसंगी दिसली. पण उज्ज्वला लाईमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.  

कतरीना कैफची आई कॅमे-यासमोर क्वचित दिसली. तिच्या आईचे नाव सुजैन आहे आणि ती विदेशात राहते. सुजैन यांना पाहून कतरीनाचे सौंदर्य तिच्या आईची देण असल्याचे तुम्ही म्हणाल.

 

2015 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आईही कमालीची सुंदर आहे. मीरा रौतेला त्यांचे नाव.

 करिश्मा आणि करिना यांची आई बबिता यादेखील कधीकाळी कलाविश्वातील हॉट अभिनेत्रींपैकी एक होत्या. 

अभिनेत्री काजोलची आई आणि लोकप्रिय अभिनेत्री तनुजा एक गुणवान अभिनेत्री होती. 

एकेकाळी अभिनेत्री श्रुती हासन हिची आई सारिका हिच्या सौंदर्यांच्या चर्चा होत्या. आजही श्रुतीची आई तितकीच सुंदर दिसते.

 अभिनेत्री आलिया भट्ट जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच तिची आई सोनी राजदानदेखील आहे.

श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे कपूर कमालीची सुंदर आहे. शिवांगी यांनी लग्नाआधी काही सिनेमात काम केले आहे.

अनन्या पांडेची आई भावना पांडे ही सुद्धा ब्युटिफुल मॉम आहे.

अभिनेत्री नुसरत भारूचाची आईही तिच्यापेक्षा कमी सुंदर नाही.

यामी गौतमची आईही सुंदर आहे.

भूमी पेडणेकरची आई सुद्धा सुंदरतेच्या बाबतीत कमी नाही.

टॅग्स :बॉलिवूडदीपिका पादुकोणआलिया भटनुसरत भारूचा