Join us

'वॉर-२' मध्ये वाणी कपूर का नाही? अभिनेत्रीने खरं काय ते सांगूनच टाकलं; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:28 IST

'वॉर-२' हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'वॉर' चा सीक्वल आहे.

Vaani Kapoor On War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan)आणि ज्युनिअर एनटीआर (Hrithik Roshan) स्टारर 'वॉर-२' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच हवा आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'वॉर-२' हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'वॉर' चा सीक्वल आहे. या सीक्वलमध्ये वाणी कपूरच्या जागी किआरा अडवाणीला कास्ट करण्यात आलं आहे. यादरम्यान आता वाणी कपूरने 'वॉर-२' मध्ये ती का नाही? यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या वाणी कपूर 'मंडला मर्डर्स' या सीरिजमुळे चर्चेत आहे. त्यात अलिकडेच वाणी कपूरने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'वॉर-२' सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, 'वॉर'सारख्या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी निर्मात्यांची खूप आभारी आहे. आता वॉर-२ साठी मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देते.शिवाय चित्रपटाचा सीक्वल देखील तितकाच दमदार असेल, असं मला वाटतं. त्यानंतर वाणी मजेशीर अंदाजात म्हणाली, 'वॉर' मध्ये मी आणि टायगर दोघांचाही मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे आता जर टायगर चित्रपटात परत आला तर मी देखील दिसेन." असं उत्तर अभिनेत्रीने दिलं. 

वाणी कपूर ही २०१९ मध्ये आलेल्या 'वॉर' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ देखील होते. 'वॉर' मध्ये वाणीने नैनाची भूमिका साकारली होती आणि ती टायगर श्रॉफच्या अपोझिट होती. दरम्यान, 'वॉर-२' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सिनेमा येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. 

टॅग्स :वाणी कपूरहृतिक रोशनज्युनिअर एनटीआरबॉलिवूडसिनेमा