Join us

"कोणी काही चुकीचं बोललं तरी...", नोरा फतेहीसोबत होणाऱ्या तुलनेवर उर्वशी रौतेलाचं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 10:33 IST

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत येत राहते. '

Urvashi Rautela : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत येत राहते. 'ग्रेट ग्रँड मस्ती' आणि 'सनम रे' यांसारख्या चित्रपटांमधून ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या अभिनेत्री सनी देओल स्टारर जाट सिनेमामुळे लाईमलाइटमध्ये आली आहे. उर्वशी अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असते. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने ट्रोल करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तसंच तिची तुलना नोरा फतेहीसोबत करणाऱ्यांना सुनावलं आहे. 

नुकतीच उर्वशी रौतेलाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर होणारी ट्रोलिंग आणि अफवाचं खंडण केलं आहे. त्यादरम्यान ती म्हणाली, "मी प्रत्येकाचं बोलणं मनावर घेत नाही. नकारात्मक कमेंट्सचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. कोणी काही चुकीचं बोललं तरी मी ते मनावर घेत नाही."

त्यानंतर अभिनेत्री नोरा फतेहीसोबत होणाऱ्या तुलनेवर भाष्य करत म्हणाली, "जर लोक माझी तुलना नोरा फतेही किंवा इतर कोणाशी करत असतील तर त्यावर माझं काहीच म्हणणं नाही. कारण प्रत्येक कलाकाराची स्वतःची एक विशिष्ट ओळख असते. यापूर्वी कलाकारांनी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलं. आता हे आमचं काम आहे की, प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देऊन इंडस्ट्रीला पुढे घेऊन जाण्याची आमची जबाबदारी आहे." असा खुलासा तिने केला.

टॅग्स :उर्वशी रौतेलानोरा फतेहीबॉलिवूडसेलिब्रिटी