Preity Zinta: दिवसामागून दिवस जातात, महिने उलटतात आणि वर्षही सरत जातं. या वर्षामध्ये बऱ्याच जणांना काही चांगले वाईट अनुभव आले असतील. सध्या सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळीही सरत्या वर्षाला अलविदा म्हणत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सध्या देशभरात सर्वत्र नव्या वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय. सिनेसृष्टीतील कलाकारही आपल्या पद्धतीने नव्या वर्षाच्या स्वागतसाठी सेलिब्रेश करताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री प्रीती झिंटानेही (Preity Zinta) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत २०२४ मधील खास आठवणींना उजाळा दिला आहे.
बॉलिवूडची डिंपल क्वीन प्रीती झिंटा आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्रीने तिच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना', 'कोई मिल गया', 'सलाम नमस्ते' यासारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर तिने सरत्या वर्षाला निरोप देत या वर्षातील तिच्या आयुष्यातील खास क्षण व्हिडीओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने त्यामध्ये लिहिलंय, "जसं जसं हे वर्ष संपतय तसे माझ्या मनात हेच विचार येतायत की या वर्षभरात आपण काय केलं. पेरूमध्ये या वर्षाचं आपण कसं स्वागत केलं शिवाय इंका ट्रेलवर कशा पद्धतीने चाललो. आपण त्या ठिकाणांना भेट दिली जिथे कधी गेलोच नव्हतो. यावर्षाच्या सुरूवातीला मी मनाशी निश्चय केला होता की हे वर्ष खास असेल आणि तसंच झालं.
पुढे अभिनेत्रीने सांगितंल की, हे वर्ष तिच्या फिल्मी करियरसाठी उत्तम राहिलं. या वर्षात तिने सिनेसृष्टीत कमबॅक केलं. त्यानंतर अभिनेत्रीने लिहिलंय, "याच वर्षी मी अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं, सेटलर परतले. बऱ्याच कालावधीनंतर मी शूटिंगला सुरूवात केली. या व्हिडीओमध्ये २०२४ मधील खास क्षणांची झलक दाखवली आहे. पेरू ते लॉस एंजलिस आणि मुंबई ते पंजाबपर्यंतचा प्रवास... अलविदा २०२४!"