Join us

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या मृणालचं आहे धुळे शहरासोबत खास नातं; खानदेशी भाषेवरही आहे प्रभुत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:50 IST

Mrunal thakur: मृणालला खानदेशी भाषा उत्तमरित्या येते हा फार मोजक्या लोकांना माहित आहे.

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.  त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्याशी निगडीत अनेक गोष्टींची चर्चा रंगत आहे. यात मृणालच्या खानदेशी भाषाप्रेमाविषयी चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

मृणाल एक मराठमोळी अभिनेत्री असल्याचं फार मोजक्या जणांना माहित आहे. बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत असलेली मृणाल मराठी कुटुंबातील असून तिचं बालपण महाराष्ट्रातच गेलं आहे. त्यामुळे तिचं मराठीवर विशेष प्रेम आहे. इतकंच नाही तर मराठीसह तिचं खानदेशी भाषेवर विशेष प्रभुत्व असल्याचं पाहायला मिळतं.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे. मृणाल मुळची धुळ्याची आहे. त्यामुळे खानदेशी भाषेवर तिचं विशेष प्रभुत्व आहे. हिंदी, इंग्लिश आणि मराठीसह मृणाल खानदेशी भाषाही तितक्याच सहजतेने बोलते.

दरम्यान, मृणालला खानदेशी भाषा उत्तमरित्या येते हा फार मोजक्या लोकांना माहित आहे. मृणालने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'लव सोनिया', 'सुपर 30',  'बाटला हाऊस', 'जर्सी',  'सुरज्या', 'विट्टी दांडू' अशा कितीतरी हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :मृणाल ठाकूरसेलिब्रिटीबॉलिवूडमहाराष्ट्र