Join us

कंगना राणौतचा नवा व्यवसाय! अभिनय अन् राजकारणानंतर हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:59 IST

अभिनेत्री कंगणा राणौतची नवी इनिंग सुरु; अभिनय अन् राजकारणानंतर हॉटेल इंडस्ट्रीत टाकलं पाऊल 

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन, अभिनेत्री कंगना राणौत(Kangana Ranaut) तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. अभिनयासह, दिग्दर्शन आणि राजकीय क्षेत्रातही कंगना  तितकीच सक्रिय आहे. दरम्यान, आता कंगना राणौत एका खास कारणामुळे चर्चेत आल्याची पाहायला मिळतेय. अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. कंगनाने हिमाचल प्रदेश येथे नवीन कॅफे सुरु केलंय. सोशल मीडियावर याबाबत माहिती देत तिने आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

नुकताच सोशल मीडियावर कंगना राणौतने सुंदर असा व्हिडीओ पोस्ट करत त्याद्वारे तिच्या नव्या कॅफेची झलक दाखवली आहे.''माझं बालपणीचं स्वप्न पूर्ण झालं, हिमालयाच्या खुशीत माझं छोटंसं कॅफे- द माउंटन स्टोरी, ही एक प्रेमकथा आहे.''अशा आशयाची पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. येत्या १४ तारखेपासून म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हे कॅफे सुरु करण्यात येणार असल्याचं तिने सांगितलं आहे. या व्हिडीओवर कंगनाच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत कौतुक केलं आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, सुरुवातीला कंगना तिच्या कॅफेमध्ये दिमाखात एन्ट्री घेते. त्यानंतर कॅफेमधील  कर्मचारी तिचं खास पद्धतीने स्वागत करतात. तिच्या स्टाफमधीसल कर्मचाऱ्यांचा पेहराव सुद्धा पहाडी भागातील लोकांप्रमाणे आहे. यावरुन कंगना त्या प्रदेशासोबत जोडलेली आहे, हे सिद्ध होतं. या व्हिडीओसोबत तिने कॅफेचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बर्फाच्छित प्रदेश आणि सुंदर डिझायन केलेलं 'द माउंटन स्टोरी' कॅफे सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

वर्कफ्रंट-

अलिकडेच कंगणा राणौत 'इमर्जन्सी' सिनेमामुळे चर्चेत आली होती. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया