Join us

"डोळ्यात आनंदाश्रू  तरळले...", जुनैद खान अन् खुशी कपूरचा 'लव्हयापा' पाहून सनी देओल भारावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:48 IST

'लव्हयापा' हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Sunny Deol On Loveyapa Cinema: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान (junaid Khan) आणि बोनी कपूर- श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) यांचा 'लव्हयापा' हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अद्वैत चंदन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून बोनी कपूर, आमिर खान आणि सृष्टी बहल आर्या यांनी निर्मिती केली आहे. व्हॅलेंटाईन वीक मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या पिढीची हटके प्रेमकहाणी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये 'लव्हयापा' बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, हा चित्रपट पाहून सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सनी देओलनेजुनैद खान आणि खुशी कपूरचं कौतुक केलं आहे. 

सध्या हिंदी सिनेसृष्टीत 'लव्हयापा' सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. तसेच नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सनी देओलने सुद्धा हा चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहून अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबतच सनी देओलने कॅप्शनध्ये लिहिलंय की, "#Loveyapa कालच पाहिला, फार छान चित्रपट आहे. जुनैद आणि खुशी दोघेही अप्रतिम कलाकार आहेत, त्यांचा अभिनय आवडला. थिएटरमधून बाहेर पडताना डोळ्यात आनंदाश्रू  तरळले. सर्वांना माझे आशीर्वाद...!" अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने या पोस्टद्वारे दिली आहे. शिवाय या पोस्टमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांनी देखील त्याने टॅग केलं आहे. 

'लव्हयापा' सिनेमात जुनैद खान, खुशी कपूर आणि आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका दिसतेय. याशिवाय कॉमेडियन किकू शारदाही सिनेमात खास भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ७ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे.

टॅग्स :सनी देओलजुनैद खानखुशी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा