Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चं वादळ काही थांबेना! 'छावा'चाही रेकॉर्ड मोडणार? एकूण कलेक्शन जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:12 IST

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' प्रदर्शित होऊन एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातल्याचं पाहायला मिळतंय.

Dhurandhar Movie 11 day Collection: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' प्रदर्शित होऊन एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. हा सिनेमा खऱ्या भारतीय गुप्तचर कारवायांवरून प्रेरित एक हाय-ऑक्टेन स्पाय थ्रिलर आहे. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी 'धुरंधर' हा एक चित्रपट  ठरला आहे. एका हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या १० दिवसांमध्ये ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणं ही फार मोठी गोष्ट आहे. धुरंधरने ही कामगिरी केली आहे. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातल्याचं पाहायला मिळतंय.

'धुरंधर' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. रिलीजला एक आठवडा उलटला असला तरी प्रेक्षकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. या चित्रपटाने सोमवारी म्हणजेच  १० दिवसांत किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे. या चित्रपटाने जगभरातही दमदार कलेक्शन केले आहेत. पाहुयात ‘धुरंधर’ने आतापर्यंत किती कमाई केली....

'धुरंधर' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी सुरूच आहे.रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळतेय. सोमवारी, रिलीजच्या दहाव्या दिवशी ‘धुरंधर’ने सुमारे ५८ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘धुरंधर’चे भारतातील एकूण कलेक्शन ३७८.७५ कोटी रुपये झाले आहे.चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फारच भावला आहे.

चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, 'धुरंधर'ने पहिल्या आठवड्यात ₹२०७.२५ कोटींची कमाई केली.याशिवाय आठव्या दिवशी 'धुरंधर'ने ३२.५ कोटी रुपये कमावले, आणि नवव्या दिवशी त्याचं कलेक्शन ५३ कोटी रुपये इतकं होतं.प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी या चित्रपटाने पुष्पा २ (२०.५ कोटी) आणि स्त्री २ (१८.५ कोटी) यांचे रेकॉर्ड मोडत दुसऱ्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल आणि 'छावा'नंतर असे करणारा या वर्षातील दुसरा चित्रपट ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh's 'Dhurandhar' unstoppable! Set to break 'Chhava' record?

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar' continues strong, earning ₹378.75 crore in India. Surpassing Pushpa 2 and Stree 2 on its eleventh day, the film is poised to join the ₹400 crore club, potentially beating 'Chhava'.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगअक्षय खन्नाअर्जुन रामपालआर.माधवनबॉलिवूडसिनेमा