Gadar Movie: बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Ameesha Patel) यांची मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. प्रेम, देशभक्ती आधारित असलेल्या या चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. २०२३ मध्ये या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सीक्वल देखील प्रचंड गाजला. पण, 'गदर: एक प्रेम कथा'साठी सनी देओल पूर्वी गोविंदाला 'गदर'ची ऑफर आली होती. पण, अभिनेत्याने ती नाकारली.
दरम्यान, एका टीव्ही शोमध्ये गोविंदाला 'गदर: एक प्रेम कथा' बद्दल एक प्रश्न विचारला होता की, अभिनेत्याने हा चित्रपट का नाकारला? त्यावर उत्तर देताना गोविंदाने सांगितलं, "आपल्याला चित्रपटातील काही सीन्स वादग्रस्त वाटले", त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं अभिनेत्याने म्हटलं. त्यानंतर तारासिंगच्या रोलसाठी सनी देओलची निवड करण्यात आली.
जवळपास २४ वर्षांपूर्वी आलेल्या सनी देओलच्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाने इतिहास रचला. तारासिंगचं देशप्रेम आणि सकीनासोबतची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली होती. अवघ्या १९ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचले होते.