Suraj Chavan Video:सोशल मीडियावर संजू राठोडच्या शेकी गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे गाणं ट्रेंडिंगवर आहे. अगदी इन्स्टाग्राम रिल्सपासून ते यु्ट्यूबवर अनेकजण या गाण्यावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. लहानग्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींनाही या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरलेला नाही. त्यात आता 'झापुक झुपूक' फेम सूरज चव्हाणलाही (Suraj Chavan) संजू राठोडच्या या ट्रेंडिंग गाण्याची भुरळ पडली आहे.
संजू राठोडच्या शेकी गाण्यानं सर्वांच्याच मनावर राज्य केलं आहे. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या डान्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. आता या गाण्यावर सूरजने सोशल मीडियावर नव्या गाडीची झलक दाखवत हटके व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 'एक नंबर तुझी कंबर' म्हणत गुलिगत किंगने खास व्हिडीओ शेअर केला आहे. सूरज चव्हाणच्या या नव्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना हा त्याचा व्हिडीओ आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. "मराठमोळा गरिबीतून वर आलेला अभिनेता...", तसंच "नाद केला सूरज भावा कडक...", अशा कमेंट्स चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओवर केल्या आहेत.