Join us

"जिथे लॉयल्टी तिथे निक्की तांबोळी..." 'बिग बॉस'च्या घरात अभिजीत-निक्कीमध्ये रंगली आहे चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:52 IST

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. दरम्यान, या आवड्यात चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना भेटण्यासाठी येत आहेत. येत्या रविवारी ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा ग्रॅंड फिनाले रंगणार आहे. ग्रँड फिनालेच्या आधी घरातील सदस्यांना 'बिग बॉस'कडून एक खास सरप्राइज देण्यात आलं. सदस्यांच्या घरातील प्रवासाचा स्पर्धकांना फ्लॅशबॅक दाखवण्यात आला. यावेळी सदस्य भावुक झालेले पाहायला मिळालं. अशातच कलर्सने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळीने केलेल्या एका विधानाने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सोशल मीडियावर कलर्स मराठीने शेअर केलेला एक प्रोमो समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये निक्की आणि अभिजीतमध्ये जोरदार चर्चा रंगल्याची पाहायला मिळते आहे. व्हिडीओमध्ये निक्की घरातील सोफ्यावर बसून अभिजीतला म्हणते, "मी नेहमीच म्हणते, जिथे लॉयल्टी असेल तिथे निक्की तांबोळी असेल. कारण मी लॉयल होती. माझ्या ग्रुपसाठी जान्हवीसाठी, धन: श्यामसाठी, मी सगळ्यांसोबत लॉयल होते. निक्कीला प्रतिक्रिया देताना अभिजीत म्हणतो, माझं पण असंच आहे, मी नेहमीच मित्रांसाठी उभा राहिलो". 

पुढे निक्की म्हणते, "चक्रव्हयूमध्ये मला दाखवलं की,अंकिता आणि डीपी सगळे एकत्र येऊन बोलायचे की या दोघांनी सी ग्रुप काढला पाहिजे. याचा तू विचार कर. पहिल्या दिवसापासूनच अख्खं घर आपल्या दोघांच्या विरोधात होतं. फक्त दिखाव्यासाठी तो ग्रुप होता किंवा नावं मोठी आहेत म्हणून आपला वापर करण्यात आला. तेव्हा अभिजीतही म्हणतो, हे चित्र दोन्ही ग्रुपमध्ये सारखंच आहे". 

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडियासोशल व्हायरल