Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणपती मिरवणुकीत बेभान होऊन नाचली 'बिग बॉस मराठी' फेम इरिना, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 18:13 IST

बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवाने देखील पुण्यातील काही मंडळांना भेटी देत बाप्पाचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवातील इरिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Bigg Boss Marathi 5 : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा माहौल पाहायला मिळत आहे. जिकडेतिकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेतात. बिग बॉस मराठी फेम इरिना रुडाकोवाने देखील पुण्यातील काही मंडळांना भेटी देत बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळचा तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेल्या परदेशी गर्ल इरिना रुडाकोवाने तिच्या मराठमोळ्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता घराबाहेर आल्यानंतरही इरिनाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गणेशोत्सवातील इरिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत इरिना साडी नेसून झांजेच्या तालावर ठेका धरला. इरिनाचा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

इरिनाने पुण्यातील मानाच्या पाच गणपतींपैकी एक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी तिने साडी नेसून मराठमोळा पेहराव केला होता. तिच्या लूकबरोबरच इरिनाच्या डान्सनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :गणेशोत्सव 2024बिग बॉस मराठीसेलिब्रिटी गणेशटिव्ही कलाकार