Join us

सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 08:42 IST

सकाळी १० वाजता बिग बॉस मराठी 5 ची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारा रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस (Bigg Boss Marathi 5). मराठी प्रेक्षकांना बिग बॉसच्या पाचव्या सिझनची उत्सुकता होती तो आता येतोय. होय, कलर्सने काल पोस्ट केलेल्या एका प्रोमोवरुन बिग बॉस मराठी सीझन 5 चीच घोषणा असल्याचं दिसत आहे. आज यावरुन पडदा उलगडणार आहे. सकाळी १० वाजता बिग बॉस मराठी 5 ची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कलर्स मराठी वाहिनीकडे सतत बिग बॉसचीच विचारणा होत होती. इतर कोणतीही नवीन मालिका, शो सुरु झाला आणि त्याचा प्रोमो आला तरी कमेंट्समध्ये प्रेक्षक बिग बॉस कधी सुरु होणार याचीच विचारणा करायचे. अखेर तो दिवस आता आलेला आहे. आज बिग बॉस मराठी 5 ची घोषणा होईल अशी शक्यता आहे. 'सर्व रिएलिटी शोज चा बाप, पुन्हा येतोय सर्वांना वेड लावायला!' असं कॅप्शन व्हिडिओसोबत देण्यात आलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती बिग बॉसच्या पाचव्या सीझनची पहिली झलक पाहण्याची. 

या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या असून प्रत्येक जण नवीन सीझनसाठी आतुर आहे. बिग बॉसच्या मागच्या सीझनचा अक्षय केळकर हा विजेता ठरला होता. तोही सीझन चांगलाच गाजला होता. आता पाचव्या सीझनमध्ये कोण असणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. तसंच महेश मांजरेकरच शो होस्ट करतील अशी आशा आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर टेलिव्हिजनसोशल मीडिया