Join us

Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:17 IST

बिग बॉस मराठी ५चा ग्रँड फिनाले सुरू होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. फिनालेआधीच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील टॉप ३ सदस्यांची नावं समोर आली आहेत. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या काही वेळातच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाचा विजेता चाहत्यांना मिळणार आहे. पण, बिग बॉस मराठी ५चा ग्रँड फिनाले सुरू होण्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. फिनालेआधीच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमधील टॉप ३ सदस्यांची नावं समोर आली आहेत. 

अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अशातच टॉप ३ स्पर्धक समोर आले आहेत. एका इन्स्टाग्राम पेजनुसार बिग बॉस मराठीच्या यंदाच्या टॉप ३ मध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी यांनी स्थान मिळवलं आहे. 

बिग बॉस मराठी अपडेट या इन्स्टाग्राम पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी यांची टॉप ३ स्पर्धक म्हणून नावे देण्यात आली आहेत. त्याबरोबरच जान्हवीने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीऐवजी पैशाची बॅग उचलणं पसंत केल्याचंही म्हटलं गेलं आहे. या पोस्टनुसार धनंजय आणि अंकिताने बिग बॉस मराठीच्या टॉप ३ मध्ये स्थान मिळवलेलं नाही. त्यामुळे कोकण हार्टेड गर्लचे चाहते नाराज झाले आहेत. 

या पोस्टवर कमेंट करत अंकिताच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंकिता टॉप २ मध्ये असायला हवी होती, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. पहिल्या दिवसापासूनच अंकिताला चाहत्यांचा सपोर्ट मिळाल्याचं दिसत होतं. त्यामुळे बिग बॉस मराठीची ट्रॉफी अंकिताने जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा होती. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकार