काल भारताने न्यूझीलंडला हरवून ICC चॅम्पियन ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरलं. रोहित शर्माच्या कॅप्टनसीखाली टीम इंडिया संपूर्ण टूर्नामेंट चांगली खेळली. याचा परिणाम म्हणजे फायनल सामन्यात टीम इंडियाला विजेतेपद मिळालं. इंडिया जिंकल्यावर सेलिब्रिटींपासून सामान्य माणसांनी आनंद व्यक्त केला. अशातच आज दुपारी अभिनेता आयुषमान खुरानाने (ayushmann khurrana) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. याशिवाय टीम इंडियासाठी खास कविता सादर केली.आयुषमानच्या कवितेचं शीर्षक आहे: कोणी हरवू शकत नाही आम्हाला — कारण देव आमचा सारथी आहे.
पण खरं सांगायचं तर, आमची टीम सेल्फलेस आहे… नि:स्वार्थी आहेशुभमन आऊट झाला, तर निराश रोहित होत होता,श्रेयस काही चूक करत होता, तर कोहलीचा चेहरा बदलत होता,कोहली आऊट झाल्यावर, केएल राहुलने चिडूनच विचारलं —'काय करताय यार? मी रिस्क घेत होतो ना!'
पाकिस्तान विरुद्ध रोहित आनंदाने उड्या मारत होता,आणि विराटला सांगत होता — 'एंडला सिक्स मार!'रोहितने कमबॅक केला, आणि त्याच्या देशाने त्याला पाठिंबा दिला,खरं सांगू, मी इतकं चांगलं हँड-आय कोऑर्डिनेशन कधीच पाहिलं नव्हतं..
आज आपण वर्ल्ड चॅम्पियन्स आहोत,कारण वरचा देव आमचा सारथी आहे!"ही कविता सादर करताना आयुषमान म्हणाला, तो अजूनही भारताच्या विजयाच्या रोमांचातून बाहेर पडू शकलेला नाही. आयुषमानने सादर केलेल्या कवितेचं त्याच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी चांगलंच कौतुक केलंय.