Join us
Daily Top 2Weekly Top 5

थाटात पार पडलं 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याच्या लेकीचं बारसं; बाळाचं नाव आहे खूपच खास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 16:07 IST

झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

Rohit Parshurm : झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रही प्रेक्षकांना आवडत आहेत. अभिनेता रोहित परशुरामी, शिवानी नाईक हे कलाकार मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. 

रोहित सध्या 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अर्जुन ही भुमिका साकारत आहे.  या मालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याला नवी ओळख मिळाली. नुकताच रोहितने त्याच्या लेकीच्या बारशाचा आणि अन्नप्राशन सोहळ्याचा खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 'रुईचं बारसं आणि अन्नप्राशन सोहळा' असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

रोहित परशुरामने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. अगदी साध्या पद्धतीने घराची सजावट करत तसेच त्याने आपल्या लेकीसाठी अन्नप्राशन सोहळ्याचं आयोजन केल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या कुटुंबियांसमवेत लाडक्या रुईचं बारसं साजरं करताना तो दिसतो आहे. व्हिडीओमध्ये रोहितने हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे तर त्याच्या पत्नी पूजाने फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. 

अन्नप्राशन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी नववा संस्कार आहे, असं म्हटलं जातं. बाळाच्या जन्मदिवसापासून १२ व्या महिन्यात बाळाला अन्नप्राशन करतात. रोहितने देखील लेकीसाठी हा छोटेखानी सोहळा आयोजित केला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारझी मराठीसोशल मीडियासोशल व्हायरल