'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे. (Ankita Lokhande) आज ती ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अंकिताने 'पवित्र रिश्ता' मालिकेत अर्चना ही भूमिका साकारली होती. तिला या मालिकेने खूप यश दिलं. आजही तिला अंकिता नाही तर अर्चना याच नावाने ओळखतात. पण अंकिता हेही तिचं खरं नाव नाहीए. काय आहे तिचं खरं नाव?
अंकिताचा जन्म इंदोरमधील मराठी कुटुंबात झाला. अंकिता लोखंडे नावाने ती इंडस्ट्रीत लोकप्रिय असली तरी तिचं खरं नाव तनुजा होतं. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिने नाव बदललं. अंकिता हे खरंतर तिचं टोपण नाव होतं. नातेवाईक, मित्रमंडळी तिला अंकिताच म्हणायचे. अभिनयात आल्यावर तिने हेच नाव अधिकृत नाव म्हणून वापरायला सुरुवात केली.
'पवित्र रिश्ता' मधून अर्चना-मानवची केमिस्ट्री खूप गाजली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतने मालिकेत मानवची भूमिका साकारली होती. अंकिता आणि सुशांत खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले. मात्र सुशांतच्या बॉलिवूडमधील यशानंतर त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांचा ब्रेकअप झाला. यामुळे अंकिता खूप दु:खी झाली होती. तिला या दु:खातून बाहेर पडायला खूप वेळ लागला. डिसेंबर २०२१ मध्ये अंकिताने बिझनेसमन विकी जैनशी लग्नगाठ बांधली. आज दोघंही सुखाचा संसार करत आहेत. त्यांनी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. इथेही ही जोडी लोकप्रिय झाली होती.