Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन-मलायका अरोरा कधी लग्न करणार? पुतण्याविषयी अनिल कपूरनेच दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:45 IST

बिग बॉसनिमित्त झालेल्या मुलाखतींमध्ये अनिल कपूरने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली.

अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) मुळे चर्चेत आहे. सलमानच्या जागी अनिल कपूर शो होस्ट करत आहे. आपल्या खास शैलीत तो सदस्यांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. बिग बॉसनिमित्त झालेल्या मुलाखतींमध्ये अनिल कपूरने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी पुतण्या अर्जुन कपूरच्यालग्नाचीही हिंट त्याने दिल्याने एकच चर्चा रंगली आहे.

अनिल कपूरने गलाटा इंडियाला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी रॅपिड फायरमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर अनिल कपूरने उत्तरं दिली. घरात सगळ्यात जासत्त फॅशनेबल कोण यावर अनिल म्हणाला, 'मी'. तर सर्वात जास्त खादाड कोण यावर त्याने लेक रिया कपूरचं नाव घेतलं. कोणत्याही कार्यक्रमात सर्वात उशिरा कोण येतं यावर तो बोनी कपूर असं म्हणाला. पॉलिटिकली इनकरेक्ट कोण यावर अनिल हसतच म्हणाला, 'नशीब ती मीडियाला मुलाखत देत नाही, माझी पत्नी.' 

यानंतर शेवटी अनिल कपूरला विचारण्यात आलं की, 'कपूर खानदानात आता कोणाचं लग्न होईल?' यावर अनिल कपूरने क्षणाचाही विलंब न लावता अर्जुन कपूरचं (Arjun Kapoor)  नाव घेतलं. 'आशा करतो की अर्जुनचं लग्न आता होईल' असं तो म्हणाला.

'बिग बॉस OTT 3'चा कालच प्रिमीयर पार पडला. अनिल कपूरचं होस्टिंग पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत. 16 सदस्यांनी काल घरात एन्ट्री केली आहे. ज्याची सगळ्यांना उत्सुकता होती ते बिग बॉस ओटीटी पुन्हा सुरु झालं आहे.

टॅग्स :अनिल कपूरअर्जुन कपूरबॉलिवूडलग्न