महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवारी(३१ ऑक्टोबर) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा आणि सिद्धार्थचा अभिनय पाहून मराठी अभिनेत्री अनघा भगरे भारावली आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' पाहिल्यानंतर अनघाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने सिद्धार्थच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. ती म्हणते, "राजे, तुम्ही तुमच्या अभिनयाच्या कौशल्याने पडद्यावर राज्य केलं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमीवर केलं. सिद्धू बाबा, तुझा प्रवास मला प्रेरणा देतो. तू तुझी स्वप्न पूर्ण केली आहेस, यासाठी तुझा अभिमान वाटतो. तू केवळ एक स्टार नाहीस, तर खऱ्या अर्थाने एक सुपरस्टार आहेल. तुझी निष्ठा, आवड आणि चिकाटी हे गुण तुला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात, आणि तुझ्या या प्रवासाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि यशासाठी शुभेच्छा. प्रेमळ व्यक्तींचा पाठिंबा आयुष्यात मोठा फरक घडवू शकतो, आणि तुझ्या यशात तुझी साथीदार तितीक्षा तावडेचा खूप मोठा वाटा आहे. तू खऱ्या अर्थाने एक स्टार आहेस".
दरम्यान, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात सिद्धार्थ बोडकेसोबत सिद्धार्थ जाधव, मंगेश देसाई, पृथ्विक प्रताप, बालकलाकार त्रिशा ठोसर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. १३ कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशी १९ लाख रुपयांता गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला आहे.
Web Summary : Anagha Bhagare praised Siddharth Bodke's performance in 'Punha Shivaji Raje Bhosle,' a film addressing farmer suicides. She lauded his dedication and partnership with Titiksha Tawde. The movie stars Siddharth Jadhav and earned ₹19 lakh on its opening day.
Web Summary : अनघा भगरे ने 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' में सिद्धार्थ बोडके के प्रदर्शन की सराहना की, जो किसानों की आत्महत्याओं को संबोधित करने वाली फिल्म है। उन्होंने उनकी निष्ठा और तितिक्षा तावडे के साथ साझेदारी की सराहना की। फिल्म में सिद्धार्थ जाधव हैं और इसने पहले दिन ₹19 लाख कमाए।