Join us

Amruta Fadanvis: 'शान' से... 'लव्ह यू लोकतंत्र' चित्रपटातून अमृता फडणवीसांचं येतंय नवं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 14:13 IST

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येत असून या गाण्याच्या स्क्रिनींगसाठी उपस्थित राहिल्याची माहिती त्यांनी ट्विटर हँडलवरुन दिली

मुंबई - भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सतत कार्यरत असतात. आपलं घर, नोकरी सांभाळून त्या छंदही जोपासतात. अमृता यांना गाणे गाण्याची आवड असून त्यांनी यापूर्वी अनेक गाणी गायली आहेत. नुकतेच त्यांनी कान्स फिल्म फेस्टीव्हललाही हजेरी लावली होती. या फेस्टीव्हलमध्ये त्यांना पुरस्कारही देण्यात आला. आता, अमृता यांनी चाहत्यांना नवं गिफ्ट दिलं आहे. 

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येत असून या गाण्याच्या स्क्रिनींगसाठी उपस्थित राहिल्याची माहिती त्यांनी ट्विटर हँडलवरुन दिली. आगामी, लव्ह यू लोकतंत्र या चित्रपटातील हे गाणं असून या गाण्यात प्रसिद्ध गायक शान हे त्यांचे सहगायक असणार आहेत. एक विनोदी राजकीय व्यंग, थ्रीलर म्युझिक असून झुरीच मीडिया हाऊस एलएलपीने या चित्रपटाची निर्मित्ती केली आहे. हा चित्रपट आणि संगीत ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित होत असल्याची माहितीही अमृता फडणवीस यांनी दिली.  अमृता फडणवीस या आपला गाण्याचा छंद जोपासतात, त्यातूनच त्यांनी अगोदर गणेशोत्सवात आणि नवरात्री उत्सवात गाणी गायली आहेत. आता, एका चित्रपटासाठी त्यांनी गाणं गायलं आहे. त्यामुळे, त्यांच्या या गाण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अमृता फडणवीस यांचा सहभाग आणि रेड कार्पेटवरील त्यांच्या हजेरीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. 

टॅग्स :अमृता फडणवीसशानसंगीतभाजपासिनेमा