साऊथ दिग्दर्शक ॲटलीने (Atlee) शाहरुख खानसह 'जवान' सिनेमा केला आणि बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. २०२३ साली आलेला 'जवान' शाहरुखच्या करिअरमधला कमबॅक सिनेमा आहे असंही म्हटलं गेलं. यानंतर ॲटलीला बॉलिवूडमध्ये भलताच लोकप्रिय झाला. आता ॲटली सलमान खानसोबत (Salman Khan) बिग बजेट सिनेमा करणार अशी चर्चा होती. पण आता काही मीडिया रिपोर्ट्नुसार सलमान खान त्याच्या सिनेमातून आऊट झाला आहे. सलमानच्या जागी कोणता अभिनेता दिसणार त्याचं नाव समोर आलं आहे.
सलमान खान आगामी 'सिकंदर' सिनेमात दिसणार आहे. यानंतर तो ॲटलीचा सिनेमा करेल अशी चर्चा होती. त्याने ॲटली निर्मित वरुण धवनच्या 'बेबी जॉन' मध्ये कॅमिओही केला होता. पण बेबी जॉन आपटला आणि सलमानचेही सिनेमे सध्या फारसे काही चालत नाहीत. त्यामुळे ॲटलीने आता चक्क अल्लू अर्जुनला (Allu Arjun) त्याच्या सिनेमासाठी कास्ट केल्याची चर्चा आहे. सलमानला काढून त्याने थेट अल्लूला घेतलं आहे. अल्लू अर्जुन पॅन इंडिया हिरो आहे. 'पुष्पा' आणि 'पुष्पा २' मधून त्याने करोडोंची कमाई केली. तो ॲटलीसोबत आधीच एक सिनेमा करणार होता पण आता त्याला सलमानचाही हा सिनेमा मिळाला आहे. त्यामुळे हा अल्लूचा पहिला हिंदी सिनेमा असू शकतो.
पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, बजेटच्या कारणामुळे सलमानला ॲटलीच्या सिनेमातून बाहेर पडावं लागत आहे. ॲटली या सिनेमासाठी जास्त पैसा खर्च करु शकत नाही. सुरुवातीला हा सिनेमा सन पिक्चर्स निर्मिती अंतर्गत ६०० कोटींमध्ये बनणार होता. मात्र आता जास्त बजेट नसल्याने सलमानच्या जागी अल्लूची वर्णी लागली आहे. अद्याप अल्लूकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सिनेमाची कहाणी पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. सिनेमात आणखी एक स्टार असणार आहे ज्याचा अद्याप खुलासा झालेला नाही. तसंच यामध्ये तीन अभिनेत्री दिसणार आहेत. यापेकी एक जान्हवी कपूर असल्याची शक्यता आहे.