Join us

'नजर ना लगे' ! आलियाने कानामागे लावला काजळाचा तीट; 'मेट गाला'वरील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 15:05 IST

Alia bhatt:आलियाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली फ्लोरल साडी परिधान केली होती. तिच्या या लूकची जगभरात चर्चा रंगली.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia bhatt) कायमच तिच्या क्यूट अंदाजामुळे चर्चेत येत असते. मात्र, यावेळी ती मेट गालाच्या रेडकार्पेटवरील स्टनिंग लूकमुळे चर्चेत आली. नुकतीच आलियाने न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या मेट गालाला हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली फ्लोरल साडी परिधान केली होती. या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. त्यामुळे जगभरातील अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. विशेष म्हणजे या साडीसह आलिया आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली. ती गोष्ट म्हणजे तिने कानामागे लावलेला काजळाचा काळा तीट.

मेट गालामधील आलियाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात तिच्या एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आलियाने डिझायनर साडीसह त्याला शोभेल अशी हेअर स्टाइल आणि मेकअप केला होता. ज्यामुळे उपस्थितांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. यामध्येच आलियाने तिच्या कानामागे काजळाचा एक लहानसा तीट लावला होता. विशेष म्हणजे प्रत्येक भारतीय घरात आपलं एखादी मुलगी छान नटूनथटून तयार झाली की तिला कोणाची दृष्ट लागू नये यासाठी कानामागे काजळाचा तीट लावला जातो. तोच आलियानेदेखील लावला होता.

आलियाचा हा काजळाचा तीट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. तिने खरंच काजळाचा तीट लावला पाहिजे, ती या साडीमध्ये दिसतीयेच एवढी छान तर काय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'बुरी नजरवाले तेरा भी हो भला', 'ती खूप गोंडस दिसतेय', 'नजरेसाठी काळा टिळा लावून तिने बरंच केलं', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, आलिया लवकरच 'जिगरा' या आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती वेदांग रैना याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

टॅग्स :आलिया भटमेट गालासेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड