Join us

Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:57 IST

आलिया भट नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचं मन जिंकते

अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) Met Gala फॅशन इव्हेंट गाजवून भारतात परतली आहे. मेट गालामधील आलियाच्या लूकचं जगभरातून खूपच कौतुक झालं. तिने नेसलेली आकर्षक साडी पाहून चाहते फिदा झाले. आलियाने भारतीय संस्कृतीला प्राधान्य देत हा लूक केला होता. त्यामुळे तिच्यावर स्तुतीसुमनं उधळली गेली. आता आलिया भारतात परतली असून नुकतीच मुंबईतील कलिना एअरपोर्टवर दिसली. तिचा बॉसी स्टायलिश लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आलिया भट नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचं मन जिंकते. साडी असो किंवा वेस्टर्न कोणत्याही स्टाईलमध्ये ती शोभून दिसते. मेट गालामध्ये तिने सब्यसाची डिझाईन साडी नेसली होती. अत्यंत सुंदर पद्धतीने तिने रॅम्पवर साडी कॅरी केली. तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मेट गालामध्ये सहभागी होण्याची आलियाची ही दुसरी वेळ होती. आता आलिया पुन्हा मुंबईत आली आहे. तिचा बॉसी लूक लक्ष वेधून घेतोय. व्हाईट टीशर्ट, लूझ पँट्स, ब्लेझर आणि गॉगल, हातात ब्रँडेड बँग अशी लूकमध्ये ती एअरपोर्टबाहेर आली. पापाराझींना एक लूक दिल्यानंतर ती लगेचच गाडीत बसली. आलिया हा स्टायलिश लूक चाहत्यांनाही भलताच आवडलाय.

मेट गालामुळे काही दिवस तिची आणि लेक राहाची ताटातूट झाली होती. तेव्हा राहा अयान मुखर्जीसोबत दिसली होती. तिचा क्युट व्हिडिओ व्हायरल झाला होता. आलिया लवकरच यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये दिसणार आहे. यासाठी आधी तिचं ट्रेनिंग सुरु आहे. शिवाय तिने निर्मित केलेला आणि अभिनय केलेला 'जिगरा' हा सिनेमाही शूट होऊन पूर्ण झाला आहे. आलियाच्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडमेट गालामुंबईसोशल मीडिया