Join us

'छावा'नंतर अक्षय खन्नाच्या नव्या सिनेमाची चर्चा, पुन्हा एकदा साकारणार खलनायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:19 IST

'छावा'मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणाऱ्या अक्षय खन्नाच्या नव्या सिनेमाची चर्चा आहे (akshaye khanna)

'छावा' सिनेमाची (chhaava movie) चांगलीच चर्चा झाली. सिनेमात अक्षय खन्नाने (akshaye khanna) साकारलेली औरंगजेबाची भूमिका प्रेक्षकांना आवडली. अक्षयच्या अभिनयाचंही कौतुक झालं. 'छावा'नंतर अक्षय खन्ना कोणत्या भूमिकेत दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे. वर्ष-दोन वर्षातून एखादा सिनेमा करुन गायब होणाऱ्या अक्षय खन्नचा आगामी प्रोजेक्ट कोणता असा सर्वांना प्रश्न पडला आहे. नुकत्याच हाती आलेल्या मिडिया रिपोर्टनुसार, अक्षय खन्नाचा पुढील सिनेमा बॉलिवूड नाही तर साऊथचा असणार आहे. जाणून घ्या.

अक्षय खन्नाचा आगामी सिनेमा

अक्षय खन्ना आता बॉलिवूड नाही तर साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार अशी चर्चा आहे. 'छावा' सिनेमा सुपरहिट झाल्याने अक्षयला विविध सिनेमांच्या ऑफर्स येत आहेत. अशातच अक्षय आता साऊथची वाट धरणार असं समजतंय. प्रशांत वर्मा यांचा आगामी सिनेमॅटिक युनिव्हर्स सिनेमा अर्थात 'महाकाली' सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिली महिला सुपरवूमन इंडस्ट्रीत दिसणार आहे. 'महाकाली' या तेलुगु सिनेमात अक्षय खन्ना खास भूमिका करणार असल्याचं समजतंय. मिडिया रिपोर्टनुसार 'महाकाली' सिनेमा अक्षय खलनायक साकारणार की कॅमिओ रोल करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार 'महाकाली' सिनेमात काम करण्यास स्वतः अक्षयही उत्सुक आहे. सध्यातरी या सिनेमाविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. काही महिन्यांपू्र्वी प्रशांत वर्मा यांनी 'महाकाली' सिनेमाची घोषणा केली होती. पण सध्या मात्र सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु आहे. त्यामुळे अक्षय या सिनेमात खरंच काम करणार की नाही, हे येणाऱ्या काळात सर्वांना कळून येईलच. पण असं जर झालं तर, 'छावा'नंतर अक्षय खन्नाला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला त्याच्या चाहत्यांना आनंद होईल.

टॅग्स :अक्षय खन्ना'छावा' चित्रपटबॉलिवूडविकी कौशल