Ajith Kumar Accident : साऊथ सुपरस्टार अजित कुमारला कार रेसिंगची किती आवड आहे, हे सर्वांना माहितेय. काही काळापूर्वीच त्याने आंदरराष्ट्रीय कार रेसिंग स्पर्धेत तिसरा क्रमां मिळून देशाची मान उंचावली होती. पण, यादरम्यान त्याच्या कारला मोठा अपघातही झाला होता. एकदा नव्हे, तर अजित कुमारचे गेल्या दोन महिन्यात 3 भीषण कार अपघात झाले आहेत. सध्या त्याच्या तिसऱ्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजित कुमार रेसिंगचा शौकीन असून, तो जगभरात आयोजित स्पर्धांमध्ये भाग घेतो. पण, अनेकदा सरावादरम्यान त्याच्या कारला अपघात झाले आहेत. मागील दोन महिन्यात अजित कुमारचा तिसऱ्यांदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित कुमारचा मॅनेजर सुरेश चंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपघाताचा व्हिडिओ पोस्ट केला असून, अजित कुमार सुरक्षित असल्याचे सांगितले.
व्हायरल व्हिडिओमध्ये अजित कुमार वेगाने कार चालवताना दिसतो, यादरम्यान समोर आलेल्या दुसऱ्या कारमुळे अजित कुमारची गाडी अनेकवेळा पलटी मारते. यात अजितची चूक नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसऱ्या कारमुळे अजितचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटते अन् अपघात होतो. पण, अपघातानंतरही अजित हार मानत नाही आणि शर्यत पूर्ण करतो.