Join us

'अंडरवर्ल्डची काही नावं सामील आहेत', अदिती शर्माचा नवा खुलासा; लग्नानंतर ४ महिन्यातच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:12 IST

पती अभिनीत कौशिकच्या आरोपांनंतर अदिती शर्माची प्रतिक्रिया

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा (Aditi Sharma) सध्या चर्चेत आहे. अभिनीत कौशिकसोबत (Abhineet Kaushik) चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने त्याच्याशी गुपचूप लग्न केलं. मात्र लग्नानंतर ४ महिन्यातच ती त्याच्यापासून वेगळी झाली. सुरुवातीला अभिनीतने तिच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावले. अदितीचं तिच्या कोअॅक्टरसोबत अफेअर असल्याचं अभिनीतने मीडियासमोर सांगितलं. तर आता अदितीनेच अभिनीतवर उलट गंभीर आरोप केले आहेत. काय आहेत ते आरोप?

अदिती शर्माने काल सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटलं आहे की,"ज्यांना आपण उत्तर देत नाही त्याला देव उत्तर देतो. जेव्हा देव उत्तर देतो ते लाजवाब असतं." 

अदिती शर्माने इंडिया फोरम्सशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, "अभिनीत माझ्यावर आधीपासून संशय घ्यायचा. मी कोणा पुरुषाशी बोलले किंवा साधं बघितलं जरी तरी त्याला संशय यायचा. मी कोणाशी चॅट केलं तरी त्याला प्रॉब्लेम होता. हार्ट इमोजीही लावलं तर तो भांडायचा. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही काऊन्सिलरकडे गेलो तर तिथे त्याने त्याला वाटत असलेल्या इनसिक्युरिटीबद्दल सांगितलं."

ती पुढे म्हणाली, "अभिनीतने मला धमक्या दिल्यानंतर मी त्याचं घर सोडलं. मी खूप घाबरले होते. यात अंडरवर्ल्डचीही काही नावं आहेत आणि त्याचा जवळचा मित्रही यात सामील आहे. माध्यमांमध्ये जाऊन माझी प्रतिमा मलीन करण्याची त्याने धमकी दिली होती तेच तो आता करत आहे."

गेल्या वर्षी नोव्हेंरबरमध्ये अभिनीत आणि अदितीने गोरेगाव येथील घरीच लग्न केलं. अदितीचा कोस्टार समर्थ गुप्ता तिचा केवळ चांगला मित्र आहे असं तिने स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र अभिनीतने तिच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारलग्नघटस्फोटसोशल मीडियागुन्हेगारी जगत