Join us

"पोटात गोळा येतो ती भावना..."; शिवाली परबच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; चाहत्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 10:04 IST

प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आपल्या आई-वडिलांच्या आयुष्यात अभिमान वाटण्याजोगा क्षण यावा. शिवाली परबचं हे स्वप्न पूर्ण झालंय (shivali parab)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून सर्वांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. शिवालीला आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये विविध कॅरेक्टर्स साकारताना पाहिलंय. शिवाली परबच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली आहे ज्यामुळे सर्वांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. ही गोष्ट म्हणजे शिवालीला तिच्या पहिल्याच नाटकासाठी झी नाट्य गौरव २०२५ पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळालं आहे. यामुळे शिवालीने तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्यात.

शिवालीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "माझं पहिलं नाटक आणि पहिलं नामांकन … फुलपाखरू उडतायत मनात , खरं तर रंगमंचावर जाण्याआधी जसं पोटात गोळा येतो ती जी भावना असते ती मी पहिल्यांदाच अनुभवली … रंगमंचावर काम करण्याची मज्जा काही वेगळीच आहे … माझ्या आई बाबांनी पाहिलेलं पहिलं नाटक ते त्यांच्या मुलीचं म्हणजे माझं, थेट तुमच्या घरातून या नाटकामुळे बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होतायत आणि त्यासाठी प्रसाद खांडेकर थँक यू सो मच... मला हे पात्र करायला दिलस , माझ्यावर विश्वास ठेवलास.." 

झी नाट्य गौरव २०२५ पुरस्कार सोहळ्यात शिवाली परबची भूमिका असलेल्या ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकाला एकूण आठ नामांकनं मिळाली आहेत. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, ओंकार राऊत हे कलाकार आहेत. या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनेच केलं आहे. सध्या महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग सुरु असून प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय. 

टॅग्स :नाटकमहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजन