Join us

सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर! साई पल्लवीने कुटुंबासोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:50 IST

अभिनेत्री साई पल्लवीच्या डान्सचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत ती कुटुंबासोबत बेभान नाचताना दिसतेय (sai pallavi)

साऊथ क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी. (sai pallavi) 'प्रेमम', 'गार्गी', 'अमरण', 'श्याम सिंगा रॉय' अशा सिनेमांमधून साईने अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केलंय. साईचं स्वतःचं एक फॅन फॉलोईग आहे. साई पल्लवीचा काही दिवसांपूर्वी बहिणीच्या लग्नातील 'अप्सरा आली' या मराठी गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ चांगलाच गाजला. अशातच साईच्या डान्सचा आणखी एक नवीन व्हिडीओ समोर येतोय. या व्हिडीओत ती कुटुंबासोबत बिनधास्त नाचताना दिसतेय.साई पल्लवीचा डान्स व्हिडीओसाई पल्लवीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत साई पल्लवी निळ्या रंगाच्या साडीत दिसतेय. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणींसोबत साई बेभान-बिनधास्त नाचताना दिसतेय. साई पल्लवी नाचण्यात इतकी मग्न आहे की, सेलिब्रिटी आहे हे ती विसरुन गेलीय. साईचं कुटुंबाशी असलेलं खास बॉन्डिंग या व्हिडीओत पाहायला मिळतंय. साईला नाचायची किती आवड आहे, हे वेळोवेळी पाहायला मिळतं. हा व्हिडीओही त्याला अपवाद नाही. साईच्या या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केलाय.साई पल्लवीचं वर्कफ्रंटसाई पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर गेल्या काही महिन्यांमध्ये साईचे दोन सिनेमे रिलीज झाले. यापैकी एक सिनेमा गाजला तर दुसरा फ्लॉप ठरला. यापैकी गाजलेला सिनेमा म्हणजे 'अमरण'. तर फ्लॉप झालेला सिनेमा म्हणजे 'थंडेल'. याशिवाय साई सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमात अभिनय करतेय. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत असून साई सिनेमात सीतेची भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :साई पल्लवीनृत्यTollywoodरणबीर कपूरबॉलिवूड