Join us

वेगवेगळ्या राहतायेत अभिनेत्रीच्या दोन्ही मुली, घटस्फोटानंतर दुसऱ्या लेकीची नवऱ्याकडे आहे कस्टडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:32 IST

अभिनेत्रीचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. दुसऱ्या पतीपासून तिला जुळ्या मुली आहेत.

'बडे अच्छे लगते है', 'शाका लाका बुम बुम', 'तुझ संग प्रीत लगाई सजना', 'कबुल है','काजल' अशा सुपरहिट मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री चाहत खन्ना (Chahat Khanna) घराघरात पोहोचली. अभिनेत्रीने दोन वेळा लग्न केलं. पण, दोन्ही वेळेस ती कमनशिबीच ठरली. चाहतचं पहिलं लग्न एका वर्षातच मोडलं तर तिचा दुसरा संसारही टिकला नाही. दुसऱ्या पतीपासून तिला जुळ्या मुली झाल्या. आता मात्र तिची एकच मुलगी तिच्याजवळ राहत असून दुसरी पूर्व पतीबरोबर राहते असा खुलासा तिने केला आहे.

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत चाहत म्हणाली, "घटस्फोट, ब्रेकअप, वेगळं होणं हे कधीच सोपं नसतं. विशेषत: जेव्हा तुम्हाला मुलं असतात. माझ्यासाठी माझा दुसरा घटस्फोट खूप कठीण होता. कारण मला जुळ्या मुली होत्या. आता माझी एक मुलगी फरहानसोबत राहते आणि दुसरी माझ्यासोबत राहते. घटस्फोटानंतरही आम्ही मुलींसाठी एकमेकांशी चांगलं बोलतो. कारण त्या आमची जबाबदारी आहेत."

"जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर घटस्फोट हा आणखी अवघड असतो. इतरांना सामोरं जाणं कठीण होतं. मी कोणालाच भेटायचे नाही. ते मला जज करतील असं मला वाटायचं. पण आता वाटतं जाऊद्या करा काय करायचं ते. लग्नापेक्षा तर घटस्फोट महागडा असतो. लग्न एका दिवसात होतं घटस्फोट घ्यायला पाच वर्षही लागतात. मी दोन्ही घटस्फोटातून पोटगी घेतली नाही."

चाहतने २००६ साली भरत नरसिंघानीशी लग्न केलं होतं. तेव्हा ती केवळ २० वर्षांची होती. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच नवऱ्याने तिला घटस्फोट दिला.पहिलं लग्न मोडल्यानंतर चाहतने २०१३ मध्ये पुन्हा लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. फरहान मिर्जाशी तिने विवाह केला होता. दुसऱ्या लग्नानंतर चाहतचं वैवाहिक जीवन सुखी होतं. चाहत आणि फरहानला दोन मुलीही झाल्या. पण, तिच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. लग्नानंतर पाच वर्षांनी २०१८ मध्ये फरहानबरोबर घटस्फोट घेण्यासाठी तिने कोर्टात धाव घेतली होती. चाहतने तिच्या नवऱ्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले होते.फरहान संशय घेत असल्याचं तिने सांगितलं होतं. त्याबरोबरच इच्छा नसतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तो भाग पाडत असल्याचा खुलासाही तिने केला होता.

टॅग्स :टिव्ही कलाकारपरिवारघटस्फोट