you will be surprised if you hear Virender Sehwag's answer about good wife ... | बायको असावी तरी कशी? सांगतोय वीरेंद्र सेहवाग
बायको असावी तरी कशी? सांगतोय वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा विविध कारणांमुळे प्रकाशझोतात असतो. आता तर चांगला बायको कोण असते, या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले आहे. सेहावागने आपल्या बायकोबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्याखाली चांगली बायको कोण असते, या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे.

इंस्टाग्रामवर सेहवागने बायकबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर कमेंट करताना त्याने लिहिले आहे की, " चुका झाल्यावरही जी आपल्या नवऱ्याला माफ करते, तीच चांगली पत्नी असते."

बाबा वीरेंद्र महाराज की जय! प्रवचन ऐका आणि यशस्वी व्हा...

सध्याच्या घडीला भारातमध्ये बरेच बाबा, महाराज आहेत. ज्यांची प्रवचनं तुफान चालतात आणि त्यांचा मोठा भक्त वर्ग असल्याचेही पाहायला मिळते. यामध्ये आता अजून एका प्रवचन देणाऱ्या महाराजांची भर पडली आहे. या बाबांचे प्रवचन ऐकाल तर जीवनात यशस्वी व्हाल, असे म्हटले जात आहे.

नजफगड निवासी हे बाबा प्रवचन देण्यात माहीर आहेत. पण हे बाबा सध्याच्या तंत्रज्ञानातल्या युगातले आहेत त्यामुळेच ते ट्विटरच्या माध्यमातून आपले प्रवचन देत असतात. आज त्यांनी अशीच एक पोस्ट ट्विटरवर टाकली आहे आणि ही पोस्ट चांगलीच वायरल होताना दिसत आहे.

virender sehwag

आता हे नवीन बाबा कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता हे आध्यात्मिक गुरु कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे कुणी आध्यात्मिक गुरु नाही तर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे. सेहवाग आपल्या ट्विटरवरून उपदेश देत असतो. आजही सेहवागने अशीच एक पोस्ट टाकली आहे.

या पोस्टमध्ये सेहवागने म्हटले आहे की, " भोले के भक्त, हनुमान के चेले, सब कुछ जित लेंगे अकेले!"

Web Title: you will be surprised if you hear Virender Sehwag's answer about good wife ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.