You Have To See Virender Sehwag's Retro Twist To Corona virus Precautions svg | Corona Virus पासून वाचण्यासाठी वीरेंद्र सेहवागचा फिल्मी अंदाज, शेअर केला भन्नाट व्हिडीओ

Corona Virus पासून वाचण्यासाठी वीरेंद्र सेहवागचा फिल्मी अंदाज, शेअर केला भन्नाट व्हिडीओ

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO) काही सूचना केल्या आहेत. जगभरात या सूचनांचं पालन होत आहेत आणि विविध क्रीडापटू जनतेला आवाहनही करत आहेत. पण, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या नेहमीच्या हटके स्टाईलमध्ये आवाहन केले आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सेहवागनं शेअर केलेला व्हिडीओ हा बॉलिवूडच्या जुन्या चित्रपटातील आहे. त्यात नायक व नायिका जवळ येण्याचा प्रयत्न करत असताना नर्तिका त्या दोघांना दूर राहण्याचा सल्ला देत आहे आणि तेही गाणं गात... दूर से असं हे गाणं आहे आणि वीरूनं ते पोस्ट केल्यानंतर आणखी व्हायरल होत आहे. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या मदतीला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मैदानावर उतरला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

सचिन म्हणाला,'' आपल्या सर्वांना कोरोनाची भीती सतावत आहे. त्यामुळे आपण स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि गरज नसल्यास लोकांच्या भेटीगाठी टाळा. कारण हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे झपाट्यानं पसरत आहे. आजारी व्यक्तीपासून लांबच राहा. तुम्हाला स्वतः आजारी असल्यासारखे वाटल्यास हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. २० मिनिटे पाण्यानं हात धुवा. घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवा. कोरोना व्हायरसला पराभूत केले जाऊ शकते आणि आपण सर्वांनी मिळून ते करायला हवं.''

View this post on Instagram

एक नागरिक के तौर पर हमारी कुछ जिम्मेदारियां हैं। हम कुछ आसान से कदमों का पालन कर कोरोना वायरस (COVID-19) को दूर रख सकते हैं। मैं आपसे अनुरोध करता हूँ कि बुनियादी बातों का ख्याल रखें ताकि हम सभी सुरक्षित रहें। . . As citizens, we have to act responsibly.‬ ‪We could follow simple steps to keep the Corona Virus at bay.‬ ‪It is my request to everyone to follow basic guidelines to try our best to ensure we all stay safe. #IndiaFightsCorona

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

Web Title: You Have To See Virender Sehwag's Retro Twist To Corona virus Precautions svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.