Yashasvi Jaiswal Record in Edgbaston IND vs ENG 2nd Test : इंग्लंड-भारत यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालनं आणखी एक दमदार खेळीसह लक्षवेधून घेतले. पहिल्या कसोटी सामन्यातील शतकी खेळीनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातही तो शतकी खेळी करेल, असे वाटत होते. पण बेन स्टोक्सनं ८७ धावांवर त्याला चकवा दिला अन् तो विकेट मागे झेलबाद झाला. यशस्वी शतकी खेळी करण्यात अयशस्वी ठरला असला तरी कसोटी कारकिर्दीतील ११ व्या अर्धशतकासह त्याने एका डावात अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. एक नजर यशस्वीच्या त्या खास रेकॉर्ड्सवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खास क्लबमध्ये एन्ट्री
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनच्या मैदानातील मोठ्या अर्धशतकी खेळीसह यशस्वी जैस्वाल इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानवार पोहचला आहे. या यादीत लिटल मास्टर सुनील गावसकर अव्वलस्थानी आहेत. त्यानी ६६ डावात २० वेळा अशी कामगिरी केली आहे. भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानं २४ डावात ८ वेळा ही कामगिरी केली आहे. यशस्वी जैस्वालनं फक्त १२ डावात ७ वेळा हा डाव साधला आहे.
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
SENA देशांत यशस्वीनं केली हवा, रोहित शर्माचा विक्रमही मोडला
यशस्वी जैस्वालनं सलामीवीराच्या रुपात SENA देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) आतापर्यंत ५ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. इंग्लंड विरुद्धच्या अर्धशतकी खेळीसह त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढलाय. रोहितनं सेना देशांत ४ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
बर्मिंगहॅमच्या मैदानातील टीम इंडियाचा नंबर वन सलामीवीर
बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानातील ८७ धावांच्या खेळीसह तो या मैदानात भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा सलामीवीर ठरलाय. याआधी १९७३ मध्ये सुधीर नाइक या दिग्गजाने इथं ७७ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड होता. सुनील गावसकर यांनी या मैदानात १९७९ च्या दौऱ्यात ६१ आणि ६८ धावांची खेळी केली होती. याशिवाय १९८६ मध्येही त्यांनी ५४ धावांची खेळी साकारली होती.
Web Title: Yashasvi Jaiswal Miss Century But Created History Break Rohit Sharma Most Fifty Plus In SENA Country Join Most Fifty In England See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.