सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन ही आयपीएलपासून खूपच फेमस झालेली आहे. अनेकांचा ती क्रशही बनली आहे. परंतू, सध्या ती अँगेज असल्याचे कळते आहे. एका प्रसिद्ध संगीतकाराच्या ती प्रेमात आकंठ बुडाल्याच्या चर्चा चित्रपटसृष्टीत सुरु झाल्या आहेत. एवढेच नाही तर हे दोघे आता लग्नाचीही तयारी करत असल्याचे समजते आहे.
प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारन हे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा रेडिवर एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये ते गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत असल्याचे म्हटले आहे. आता ते त्यांचे नाते पुढे नेऊ इच्छितात असेही यात म्हटले आहे. काव्या मारनविषयी तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाल्याने पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तसेच तिच्या चाहत्यांच्या उत्सुकता देखील वाढल्या आहेत.
रविचंदर हा प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा पुतण्या आहे. त्याने जेलर, जवान, पेट्टा, विक्रम, देवरा आणि लिओ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांना संगीत दिलेले आहे. काव्या आणि अनिरुद्धला नुकतेच एका खासगी डिनरमध्ये एकत्र पाहिले गेले होते. यानंतर एका रेडिट अकाऊंटवरून त्यांचे लास वेगास ट्रिप, हॉटेल आणि फिरण्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
या युजरने त्यांना वर्षभरापूर्वी लास वेगासमध्ये पाहिले होते. ते एकमेकांसोबत खूश होते असा दावा या युजरने केला आहे. दस्तुरखुद्द रजनिकांत यांनीच कलानिधी मारन यांच्याकडे अनिरुद्धसाठी मागणी घातली आहे. अद्याप यावर अधिकृत असे काहीच समोर आलेले नाही. परंतू, काही लोकांच्या दाव्यानुसार बंद दाराआड लग्नाच्या चर्चा आणि तयारी आधीच सुरु झालेली आहे.
Web Title: Will SRH Owner Kavya Maran tie the knot? This famous musician Anirudh ravichander is going on a date, Rajinikanth is in talks...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.