‘पृथ्वी वादळ’ उत्तर प्रदेश थोपविणार? विजय हजारे करंडक अंतिम सामन्यात मुंबई प्रबळ दावेदार

पृथ्वीने आतापर्यंत ७५४ धावा केल्या असून त्यात नाबाद १०५, नाबाद २२७, नाबाद १८५ आणि १६५ अशा तकी खेळीचा समावेश आहे. रोहितने विश्रांती घेतल्यास इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत पृथ्वीला संधी मिळू शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:51 AM2021-03-14T04:51:16+5:302021-03-14T04:53:30+5:30

whatsapp join usJoin us
Will 'Prithvi Storm' stop Uttar Pradesh? Mumbai are strong contenders in the Vijay Hazare Trophy final | ‘पृथ्वी वादळ’ उत्तर प्रदेश थोपविणार? विजय हजारे करंडक अंतिम सामन्यात मुंबई प्रबळ दावेदार

‘पृथ्वी वादळ’ उत्तर प्रदेश थोपविणार? विजय हजारे करंडक अंतिम सामन्यात मुंबई प्रबळ दावेदार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात विजय हजारे करंडक वन डे स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी खेळला जाईल. शानदार फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा कर्णधार पृथ्वी याचा फलंदाजीतील झंझावात उत्तर प्रदेश संघ पेलवेल कसा, हे चाहत्यांसाठी उत्कंठापूर्ण ठरणार आहे. पृथ्वीच्या फलंदाजीवर राष्ट्रीय निवडकर्त्यांचे देखील लक्ष असेल. (Will 'Prithvi Storm' stop Uttar Pradesh? Mumbai are strong contenders in the Vijay Hazare Trophy final)

पृथ्वीने आतापर्यंत ७५४ धावा केल्या असून त्यात नाबाद १०५, नाबाद २२७, नाबाद १८५ आणि १६५ अशा तकी खेळीचा समावेश आहे. रोहितने विश्रांती घेतल्यास इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत पृथ्वीला संधी मिळू शकेल. २१ वर्षांच्या या फलंदाजाने धडा घेत वन डे स्पर्धेत मोठी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. राष्ट्रीय निवडकर्ते आता अधिक काळ त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत.
कोच ज्ञानेंद्र पांडेच्या मार्गदर्शनात  युवा कर्णधार करण शर्मा याच्या उत्तर प्रदेशने शानदार कामगिरी केली. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल पृथ्वीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. 

Web Title: Will 'Prithvi Storm' stop Uttar Pradesh? Mumbai are strong contenders in the Vijay Hazare Trophy final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.