WI v SL 2021: Herschelle Gibbs and Yuvraj Singh welcome Kieron Pollard to six 6s club | Kieron Pollard : हर्षेल गिब्स, युवराज सिंगनं 'स्पेशल क्लब'मध्ये किरॉन पोलार्डचं केलं स्वागत, म्हणाले...

Kieron Pollard : हर्षेल गिब्स, युवराज सिंगनं 'स्पेशल क्लब'मध्ये किरॉन पोलार्डचं केलं स्वागत, म्हणाले...

वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) यानं गुरुवारी एका षटकात सहा षटकार खेचून युवराज सिंग Yuvraj Singh) आणि हर्षेल गिब्स ( Herschelle Gibbs) यांच्या क्लबमध्ये जाऊन बसला.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार खेचणारा पोलार्ड हा जगातला तिसरा फलंदाज आहे. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेल्या १३२ धावांचा ( Sri Lanka vs West Indies T20I) पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव ३ बाद ५२ असा गडगडला होता. तेव्हा पोलार्ड फलंदाजीला आला. त्यानं फिरकीपटू अकिला धनंजया ( Akila Dananjaya ) याच्या एका षटकात सहा षटकार खेचले.  धनंजयानं त्यापूर्वीच्या षटकात हॅटट्रिक घेतली होती. जसप्रीत बुमराहची 'नवरी' राजकोटसाठी रवाना; दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत घेणार सात फेरे?

पोलार्ड म्हणाला,''षटकार मारण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार डोक्यात सुरू होता. षटकात ३० धावा कराव्या की षटकार मारावा असा विचार सुरू असताना पहिला चेंडू पॅडच्या दिशेनं टाकला. तेव्हा मी म्हणालो थोडं थांबूया आणि नंतर षटकार मारण्यास सुरूवात करूया. त्यामुळे फिरकीपटूला मी टार्गेट केलं.'' 

एका षटकात सहा षटकार मारणे फलंदाज
गॅरी सोबर्स ( प्रथम श्रेणी क्रिकेट) १९६८ 
रवी शास्त्री ( प्रथम श्रेणी क्रिकेट) १९८५  
हर्षल गिब्स ( वन डे आंतरराष्ट्रीय ) २००७ 
युवराज सिंग ( ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय ) २००७
रोस व्हाईटली ( ट्वेंटी-२०) २०१७
हझरतुल्लाह झझाई ( ट्वेंटी-२०) २०१८
लिओ कार्टर ( ट्वेंटी-20) २०२०
किरॉन पोलार्ड ( ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय) २०२१   

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम हर्षेल गिब्सनं सर्वप्रथम केला. त्यानं २००७च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडविरुद्ध ही फटकेबाजी केली. हर्षेल गिब्सनं पोलार्डचं स्वागत केलं. तो म्हणाला, सहा चेंडूवर सहा षटकार मारण्यासाठी मार्च महिना पोषक आहे. १६/०३/२००७ आणि ३/३/२०२१.. अभिनंदन पोलार्ड.


युवीनंही २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली होती. युवीनं ट्विट केलं की,'' स्पेशल क्लबमध्ये तुझे स्वागत.''  

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WI v SL 2021: Herschelle Gibbs and Yuvraj Singh welcome Kieron Pollard to six 6s club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.