IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

संजू सॅमसन सेम प्राइज टॅगसह CSK च्या ताफ्यात, पण जड्डूला ४ कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:01 IST2025-11-16T13:59:31+5:302025-11-16T14:01:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Why Ravindra Jadeja Take Pay Cut To Leave Chennai Super Kings And Join Rajasthan Royals IPL 2026 | IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

Why Ravindra Jadeja Take Pay Cut To Leave CSK And Join RR : भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ज संघातून पुन्हा आपल्या जुन्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामाआधी  चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड डील झाली. खेळाडूंच्या अदलाबदलीच्या या खेळात  CSK संघाने जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात RR कडून संजू सॅमसनला आपल्या संघात घेतले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संजू सॅमसन सेम प्राइज टॅगसह CSK च्या ताफ्यात, पण जड्डूला ४ कोटींचा फटका

संजू सॅमसनचा संघ बदला असला तरी CSK कडूनही तो RR नं जी १८ कोटींची प्राइज टॅग लावली होती त्या रक्कमेसह खेळताना दिसेल. याउलट CSK कडून १८ कोटींच्या प्राइज टॅगसह खेळणाऱ्या जड्डूला RR १४ कोटी रुपये देणार आहे. याचा अर्थ त्याला ४ कोटींचा घाटा झाला आहे. इथं जाणून घेऊयात त्याच्या पगार कपाती मागचं कारण नेमकं कारण काय? यासंदर्भातील खास स्टोरी

IPL 2026 Auction : MI कडे सर्वात कमी बजेट! मिनी 'शॉपिंग'साठी कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम उरली?

जडेजाने ४ कोटी कमी का घेतले?

IPL च्या नियमानुसार, ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची अदलाबदली करताना खेळाडू आणि नवी फ्रँचायझी यांच्यात परस्पर सहमतीने फी ठरवली जाते. म्हणजे RR मध्ये जाण्यापूर्वी जडेजा आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली होती. त्या चर्चेनंतर त्यांची फी ठरवली गेली आहे. जडेजाच्या फीतील कपात ही त्यांची आणि फ्रँचायझीची आपापसातील सहमती आहे. यात बोर्ड किंवा मागील संघ CSK चा काहीही संबंध नाही. राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बडाले यांनी जड्डूसोबत महिनाभर संपर्कात होतो असे सांगत तो RR कडून खेळण्यासाठी उत्सुक असल्याची गोष्टही बोलून दाखवलीये. त्यामुळे पगार कपातीला तयारी दर्शवत जड्डूनं कॅप्टन्सीची डिमांडही केली असण्याची शक्यता आहे.

जडेजाची फी कमी केल्याने RR ला मिळाले 3 महत्त्वाचे खेळाडू

जडेजा ४ कोटी कमी घेण्यास तयार झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या संघाला सॅम करन (२.४) कोटी आणि डोनोवन फरेरा (१ कोटी) या खेळाडूंना संघात घेणं सहज शक्य झाले. एवढेच नव्हे तर मिनी लिलावात ६० लाख अतिरक्त रक्कमही त्यांच्या पर्समध्ये शिल्लक राहिली आहे.
 

Web Title : आईपीएल 2026: रवींद्र जडेजा के वेतन में ₹4 करोड़ की कटौती क्यों?

Web Summary : रवींद्र जडेजा एक ट्रेड में सीएसके से राजस्थान रॉयल्स में लौटे। उन्होंने आरआर के साथ आपसी सहमति से ₹4 करोड़ की वेतन कटौती स्वीकार की। इससे आरआर को सैम करन और डोनोवन फरेरा को हासिल करने में मदद मिली, जिससे आईपीएल 2026 के लिए उनकी टीम मजबूत हुई।

Web Title : IPL 2026: Why Ravindra Jadeja's salary decreased by ₹4 crore?

Web Summary : Ravindra Jadeja returns to Rajasthan Royals from CSK in a trade. He accepted a ₹4 crore pay cut, mutually agreed upon with RR. This allowed RR to acquire Sam Curran and Donovan Ferreira, strengthening their squad for IPL 2026.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.