पाचव्या कन्येचं नाव काय ठेवू? आफ्रिदीने फॅन्सकडून मागवला सल्ला, जिंकणाऱ्यास देणार खास बक्षीस

आफ्रिदीने आपल्या चाहत्यांकडून एक सल्ला मागितला आहे. आफ्रिदीने एक ट्विट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 03:49 PM2020-02-19T15:49:56+5:302020-02-19T15:52:11+5:30

whatsapp join usJoin us
What shall I name the fifth daughter? Shahid Afridi asks fans to give him a special prize | पाचव्या कन्येचं नाव काय ठेवू? आफ्रिदीने फॅन्सकडून मागवला सल्ला, जिंकणाऱ्यास देणार खास बक्षीस

पाचव्या कन्येचं नाव काय ठेवू? आफ्रिदीने फॅन्सकडून मागवला सल्ला, जिंकणाऱ्यास देणार खास बक्षीस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पाचवे कन्यारत्न झाले. पण यानंतर मात्र एक अजब गोष्ट आफ्रिदीने केली आहे. आफ्रिदीने चाहत्यांकडून कन्यारत्न झाल्यावर काही सल्ले मागितले आहेत. जो चाहता योग्य सल्ला देईल त्याला भरघोस बक्षिसही आफ्रिदी देणार आहे.

आफ्रिदीला १५ फेब्रुवारीला पाचवे कन्यारत्न झाले. आफ्रिदीने ही माहिती ट्विटरवर फोटो पोस्ट करून दिली आहे. आफ्रिदीला पाचवी मुलगी झाली असली तरी त्याचे आपल्या मुलींबाबतचे वर्तन योग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. आफ्रिदी स्वत: एक खेळाडू होता. पण आपल्या मुलींना तो मैदानी खेळ खेळण्यासाठी पाठवत नाही. आफ्रिदीच्या या गोष्टीवर जोरदार टीका झाली. पण तरीही आफ्रिदीला या निर्णयाबाबत खेद नाही. उलट माझा निर्णय योग्यच असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे.

यापूर्वी आफ्रिदीला चार मुली आहेत. आपली चुलत बहिण नादिरा आफ्रिदीबरोबर शाहिदने लग्न केले आहे. पण आफ्रिदी लग्नानंतर काही गोष्टींसाठी कुप्रसिद्ध ठरत आहे. शाहिद आपल्या मुलींना मैदानी खेळ खेळायला देत नसल्याचे वृत्तही सर्वत्र पसरले आहे. पण आपल्या या निर्णयाबद्दल शाहिदला खेद वाटत नाही. कुणी काहीही म्हणो, माझा निर्णय योग्यच आहे, असे शाहिदने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

 

आफ्रिदीने आपल्या चाहत्यांकडून एक सल्ला मागितला आहे. आफ्रिदीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आफ्रिदी म्हणाला आहे की, " माझ्या सर्व मुलींची नावं 'A' या अक्षरावरून सुरु होतात. आता मला पाचवे कन्यारत्न झाले आहे. तिचे नाव काय ठेवावे, हा सल्ला तुम्ही मला द्या. ज्याचा सल्ला मला योग्य वाटेल त्याला मी बक्षिसही देईन." 

पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!
भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमधील संबंध हे जगजाहीर आहेत. त्यामुळेच उभय देशांमधील द्विदेशीय क्रिकेट मालिका गेली अनेक वर्ष बंद आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांसह आशिया चषक स्पर्धेत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात आणि तो सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. पण, आगामी आशिया चषक स्पर्धेत उभय संघांमध्ये सामना होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आशिया क्रिकेट परिषदेनं आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला दिलं आहे. पण, टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातून सुवर्णमध्य काढायचा झाल्यास टीम इंडियाचे सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्याची चाचपणीही सुरू आहे. 

टीम इंडियानं पाकिस्तानात न खेळण्याची भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) 2021मध्ये भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. पण, त्वरित त्यांनी माघारही घेतली. त्यामुळे यंदाच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी होणारा आशिया चषक कोठे खेळवण्यात येईल, यावर अजून सस्पेन्स कायम आहे. त्यात आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं उडी घेतली आहे. आशिया चषक स्पर्धेबाबत बीसीसीआयनं आपली भूमिका स्पष्ट करताना भारतीय खेळाडू पाकिस्तानात खेळण्यात उत्सुक नाहीत, त्यामुळे भारताचे सामना तटस्थ ठिकाणी खेळवा, असे सांगितले होते. तरीही आफ्रिदीनं टीम इंडियाला थेट पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्याचं आव्हान केलं आहे. पण, दोन्ही देशांमधील मालिका तटस्थ ठिकाणी व्हाव्यात, या मतावरही त्यानं सहमती दर्शवली. 

''संपूर्ण पाकिस्तान सूपर लीग येथे खेळवण्यात आली. त्यामुळे जगभरात सकारात्मक संदेश गेला आहे. शिवाय श्रीलंका आणि बांगलादेश संघानंही पाकिस्तान दौरा केला आणि येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्याची मी वाट पाहत आहे,''असे मत आफ्रिदीनं व्यक्त केलं. तो पुढे म्हणाला,''आशिया चषक भारत आणि पाकिस्तान येथे खेळवण्यात यावा. पाकिस्तान आणि भारत यांनी एकत्र येऊन समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवं. त्यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको. दोन देशांमध्ये अनेक समस्या आहेत आणि एकत्र येऊन चर्चा केल्याशिवाय ते सुटणारे नाही. पण, आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांनी खेळायलाच हवं.''

Web Title: What shall I name the fifth daughter? Shahid Afridi asks fans to give him a special prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.