भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीवर नाराजी व्यक्त केली. रोहित आणि विराट दोघेही मोठे खेळाडू आहेत. त्यांच्या जाण्याने संघात पोकळी निर्माण निर्माण होईल, अशी चिंता योगराज सिंह यांनी व्यक्त केली आहे.
योगराज सिंग म्हणाले की, 'विराट कोहली मोठा खेळाडू आहे. त्याच्या जाण्याने भारतीय कसोटी संघाला मोठा तोटा होईल. २०११ च्या विश्वचषकानंतर अनेक खेळाडूंना संघातून काढण्यात आले. त्यांना निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर संघ तुटला आणि तो अजूनही सावरू शकलेला नाही. प्रत्येक खेळाडूची निवृत्तीची वेळ येते, पण मला वाटते की विराट आणि रोहितमध्ये अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे.'
'युवराजने निवृत्तीचा निर्णय घेतला, तेव्हा मी त्याला सांगितले होते की, हे योग्य पाऊल नाही. मैदान तेव्हाच सोडावे, जेव्हा आपले पाय थकतात. अनुभवी खेळाडूंचा अभाव संघामध्ये अस्थिरता निर्माण करू शकते. त्यांनी युवा खेळाडूंचा संघ बनवला. कदाचित विराट कोहलीला वाटले असेल की, त्याला आता आणखी काही साध्य करायचे राहिलेले नाही', असे योगिराज म्हणाले.
पुढे कर्णधाराबद्दल बोलताना योगिराज म्हणाले की, 'योग्य पाठिंबा मिळाला की, कर्णधार आपली कसोटी कारकिर्द वाढवू शकतो. रोहित शर्माला प्रेरित करण्यासाठी फक्त एका व्यक्तीची गरज होती, असे मला वाटते. रोहित शर्मा आणि वीरंद्र सेहवाग हे दोघे खूप लवकर निवृत्त झाले. महान खेळाडूंनी वयाच्या पन्नाशीपर्यंत खेळले पाहिजे. त्यांच्या निवृत्तीमुळे मला वाटत वाटते. कारण तरुणांना प्रेरणा देणारे कोणीही राहिलेले नाही.'
Web Title: Watch Video: Yograj Singh Reacts To Virat Kohli and Rohit Sharma Bidding Farewell To Test Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.