Video : आंद्रे रसेलच्या घरी Good News; केली हटके स्टाईलनं घोषणा

वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या घरी लहान पाहुणा येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:48 AM2019-09-17T10:48:38+5:302019-09-17T10:49:21+5:30

whatsapp join usJoin us
watch video : Andre russell and jassym lora announce arrival of baby in unique style  | Video : आंद्रे रसेलच्या घरी Good News; केली हटके स्टाईलनं घोषणा

Video : आंद्रे रसेलच्या घरी Good News; केली हटके स्टाईलनं घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जमैका : वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या घरी लहान पाहुणा येणार आहे. रसेलनं इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबतची घोषणा केली. प्रथमच बाप बनण्याचा आनंद त्यानं हटके स्टाईलनं साजरा केला. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो पत्नी जैसन लॉरा बेबी शॉव्हर सेरेमनीत सहभागी झालेला दिसत आहेत. या व्हिडीओत रसेल फलंदाजी करत आहे, तर लॉराच्या हातात चेंडू दिसत आहे.


OMG : आंद्रे रसेलच्या डोक्यावर चेंडू आदळला; स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये  
जमैका : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये विक्रमांचा पाऊस पडत असताना काही दिवसांपूर्वी काळळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती. वेस्ट इंडिज संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट आंद्रे रसेलच्या डोक्यावर वेगाने चेंडू आदळला. हा आघात इतका वेगवान होता की रसेल मैदानावरच आडवा झाला आणि त्याला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये रसेल जमैका थलावाज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सेंट ल्युसिया झौक्स संघाविरुद्धच्या सामन्यात ही घटना घडली.

सामन्याच्या 14 व्या षटकात झौक्स संघाचा वेगवान गोलंदाज हार्डस विलजोनचा बाऊंसर रसेलच्या डोक्यावर जोरात आदळला. हा चेंडू कानाच्या अगदी जवळ आदळला.  त्यानंतर लगेचच रसेल मैदानावर आडवा झाला. त्याच्या अवतीभवती इतर खेळाडू जमले आणि त्यांनी रसेलचा हॅल्मेट बाजूला केले. त्यानंतर त्वरितच वैद्यकिय पथक दाखल झाले आणि त्यांनी रलेसलला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेले. 


 

Web Title: watch video : Andre russell and jassym lora announce arrival of baby in unique style 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.