Video : ख्रिस गेल ढसाढसा रडू लागला, सोशल मीडियावर त्याची इमोशनल बाजू आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:52 PM2021-05-11T16:52:08+5:302021-05-11T16:52:56+5:30

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) हा ढसाढसा रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

WATCH - "See you on the other side mom," Chris Gayle gets emotional on Mother's Day | Video : ख्रिस गेल ढसाढसा रडू लागला, सोशल मीडियावर त्याची इमोशनल बाजू आली समोर

Video : ख्रिस गेल ढसाढसा रडू लागला, सोशल मीडियावर त्याची इमोशनल बाजू आली समोर

Next

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) हा ढसाढसा रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजीसोबतच नकला करून मनोरंजन करणाऱ्या गेलला रडताना पाहून चाहतेही हैराण झाले. सोशल मीडियावर आतापर्यंत गेलचा मज्जामस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले होते. पण, त्याच्या नव्या व्हिडीओनं सर्वांना इमोशनल केलं आहे.

मदर्स डे ला गेलनं हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात आपल्या आईच्या आठवणीनं गेल भावूक झाला. त्यानं इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो रडताना दिसत आहे. त्यानं लिहिलं की,''आई माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे. तुला माझा अभिमान वाटत असेल, याची मला खात्री आहे. मला तुझी खूप आठवण येतेय. तुझी आठवण नेहमी सोबत राहील.'' 2018मध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं गेलच्या आईचं निधन झालं होतं. 

पाहा व्हिडीओ...


ख्रिस गेलनं ४२४ ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १३,८९८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २२ शतकं व ८६ अर्धशतकं आहेत. त्यानं १०७३ चौकार व १०१७ षटकार खेचले आहेत. ट्वेंटी-२० त हजार चौकार व षटकार खेचणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WATCH - "See you on the other side mom," Chris Gayle gets emotional on Mother's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app