भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातला चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. टीम इंडियानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असली तरी चौथा सामना जिंकून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं तिकीट पक्क करण्याचा खेळाडूंचा निर्धार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. BCCIनं खेळाडूंचा सराव करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात विराट कोहली ( Virat Kohli), रोहित शर्मा ( Rohit Sharma), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि अन्य खेळाडू मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना दिसले. रोहित शर्मानं इंग्लंडची फिरकी घेण्याचा केला प्रयत्न, पत्नी रितिकाच्या कमेंटनं काढली 'हिटमॅन'ची विकेट

बीसीसीआयनं पोस्ट केलेल्या व्हिडीओ आणि फोटोपैकी एकात विराट व रोहित एकमेकांशेजारी बसलेले पाहायला मिळाले. त्यावरून नेटिझन्सनी चर्चेचा धुरळाच उडवला. विराट-रोहित यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या आणि सोशल मीडियावर त्याला खमंग फोडणीही दिली गेली. त्यामुळे या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चर्चा झाली नसती तर आश्चर्य व्यक्त करण्यात आलं असतं.

  • चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहनं वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आणि ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.
  • तिसऱ्या कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला होता. अक्षर पटेलनं दोन्ही डावांत मिळून ११ विकेट्स घेतल्या होत्या, तर आर अश्विननं ७ विकेट्स घेतल्या. या सामन्यात ३० पैकी २८ विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. त्यामुळे खेळपट्टीवरून वाद सुरू आहे.
  • अशात चौथ्या कसोटीसाठीही फिरकीला पोषकच खेळपट्टी बनवण्यात आली आहे. खेळपट्टीवर गवत असल्याचे पाहायला मिळत आहे. 
  • त्यामुळे कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) संघात दोन बदल करण्याच्या तयारीत आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. यादवनं नुकतीच फिटनेस टेस्ट पास केली आहे.
  • तिसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला जास्त षटकं टाकण्याची संधी मिळाली नाही. त्याच्याजागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पटकावू शकतो. कुलदीप, आर अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकीपटूंसह संघ मैदानावर उतरणार आहे.
  • भारतीय संघ ( Playing XI) - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, उमेश यादव.
     

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Virat not sharing water with Rohit: Twitterati has hilarious reactions to their pic from Team India's session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.