Rohit Sharma posts a cheeky caption about the pitch before fourth Test, Ritika Sajdeh’s trolled him | रोहित शर्मानं इंग्लंडची फिरकी घेण्याचा केला प्रयत्न, पत्नी रितिकाच्या कमेंटनं काढली 'हिटमॅन'ची विकेट

रोहित शर्मानं इंग्लंडची फिरकी घेण्याचा केला प्रयत्न, पत्नी रितिकाच्या कमेंटनं काढली 'हिटमॅन'ची विकेट

भारत-इंग्लंड ( India vs England Test ) यांच्यातल्या कसोटी मालिकेत खेळपट्टीचा विषय हा अधिक चर्चिला जात आहे. तिसरी कसोटी तर अवघ्या दोन दिवसांत संपली. ४ मार्चपासून चौथी कसोटी सुरू होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया कसून सरावही करत आहे. याही सामन्यात खेळपट्टी फिरकीला पोषक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) यानं एक पोस्ट लिहून इंग्लंडच्या संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या या फोटोवर पत्नी रितिका सजदेह ( Ritika Sajdeh) हिनं मजेशील कमेंट करून हिटमॅनची विकेट घेतली. ( Ritika Sajdeh’s trolled Rohit Sharma )  शार्दूल ठाकूरची वादळी खेळी, १२ चेंडूत कुटल्या ६० धावा; मॅचसाठी कारनं केला ७०० किमी प्रवास 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियवरच ( Narendra Modi Stadium in Ahmedabad) चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. येथे खेळवण्यात आलेला तिसरा सामना दोन दिवसांत संपला आणि इंग्लंडला टीम इंडियानं ११२ व ८१ धावांत गुंडाळले. इंग्लंडच्या फलंदाजांच्या तांत्रिक चुकांपेक्षा खेळपट्टीलाच अधिक दोष दिला गेला. रोहितनं चौथ्या कसोटीपूर्वी एक फोटो पोस्ट केला. त्यात तो मैदानावर झोपला आहे आणि खेळपट्टीकडे पाहत ती नक्की कशी असेल, याचा अंदाज बांधत आहे. त्यावर त्यानं तसं लिहिलंही आहे.रोहितनं या कसोटी मालिकेत ६ डावांत २९६ धावा केल्या आहेत.  शाहिद आफ्रिदीनं २५ वर्ष जगाला फसवलं?; वन डेतील युवा शतकविराचा विक्रम त्याचा नाहीच, जाणून घ्या नेमकं काय घडलं


त्याच्या पोस्टवर रितिकानं फिरकी घेतली. तिनं कमेंट केली की, मी अशी लोळत असते, तेव्हा माझी मस्करी करतोस.

जसप्रीत बुमराहची माघार
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणास्तव बुमराहने या सामन्यामधून माघार घेतली आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयला विनंती केली आहे. दरम्यान, बुमराहच्या जागी भारतीय संघात नव्या खेळाडूचा समावेस करण्यात आलेला नाही. आता चौथ्या कसोटी सामन्यासाठी जसप्रित बुमराहच्या जागी इशांत शर्मा किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते.  इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी; टीम इंडिया चौथ्या कसोटीत दोन बदल करून मोठा डाव टाकणार

दोन्ही संघ
भारत -  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव. 

इंग्लंड - जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जेक क्रॉली, बेन फोक्स, डेन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन आणि मार्क वूड 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rohit Sharma posts a cheeky caption about the pitch before fourth Test, Ritika Sajdeh’s trolled him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.