Vijay Hazare Trophy : Shardul Thakur notches up a quickfire against Himachal, score 92 runs with 6 six & 6 fours | Shardul Thakur : शार्दूल ठाकूरची वादळी खेळी, १२ चेंडूत कुटल्या ६० धावा; मॅचसाठी कारनं केला ७०० किमी प्रवास 

Shardul Thakur : शार्दूल ठाकूरची वादळी खेळी, १२ चेंडूत कुटल्या ६० धावा; मॅचसाठी कारनं केला ७०० किमी प्रवास 

ठळक मुद्देइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून रिलीज केल्यानंतर केला होता कारने प्रवास१४ तासांचा अहमदाबाद ते जयपूर असा ७०० किलोमीटरचा प्रवासलिस्ट ए क्रिकेटमधील त्याचे पहिलेच अर्धशतक

Vijay Hazare Trophy 2021 : विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत मुंबईचा गोलंदाज शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यानं पुन्हा एकदा फलंदाजीत कमाल दाखवली. BCCIनं रिलीज केल्यानंतर शार्दूलनं क्रिकेटच्या प्रेमासाठी अहमदाबाद ते जयपूर असा ७०० किलोमीटरचा प्रवास कारनं केला. तो विमानानं गेला असता तर त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं असतं आणि त्याला मुंबईकडून ( Mumbai ) काही सामने खेळता आले नसते. त्यामुळे त्यानं कारनं जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शार्दूल आज तिसरा सामना खेळला आणि हिमाचल प्रदेशच्या ( Himachal Pradesh ) गोलंदाजांची धुलाई करताना मुंबईला ३२१ धावांचा डोंगर उभा करून दिला. शाब्बास शार्दूल! क्रिकेटवरील प्रेमासाठी कारनं केला ७०० किलोमीटर प्रवास; जाणून घ्या कारण

हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ८ धावांवर माघारी परतले होते. यशस्वी जैस्वाल ( २), पृथ्वी शॉ ( २) आणि कर्णधार श्रेयस अय्यर ( २) हे अपयशी ठरल्यानंतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मुंबईची पडझड रोखली. त्यानं सर्फराज खानसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. पण, सर्फराज ( ११) माघारी परतला. आदित्य तरे आणि सूर्या यांनी हिमाचलच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्या ७५ चेंडूंत १५ चौकारांसह ९१ धावांवर माघारी परतला. आदित्यही ९८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ८३ धावांवर बाद झाला. IND vs ENG, 4th Test : इंग्लंडसाठी ट्रिकी खेळपट्टी; टीम इंडिया चौथ्या कसोटीत दोन बदल करून मोठा डाव टाकणार

५ बाद १४८ अशा अवस्थेत असलेल्या मुंबईची गाडी रुळावर आल्यानंतर शार्दूल ठाकूरच्या तुफान फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुद्ध केलं. मागील तीन सामन्यांत ७ विकेट्स व २२ धावा करणाऱ्या शार्दूलनं आज कमाल केली. त्यानं ५७ चेंडूंत ९२ धावा कुटल्या. यापैकी ६० धावा या त्यानं चौकार ( ६) व षटकार ( ६) खेचून अवघ्या १२ चेंडूंत केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं ९ बाद ३२१ धावांचा डोंगर उभा केला. २०११चा वर्ल्ड कप खेळला, २०१२मध्ये CSKला IPL चॅम्पियन बनवलं अन् आता ऑस्ट्रेलियात चालवतोय बस!

पाहा व्हिडीओ...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vijay Hazare Trophy : Shardul Thakur notches up a quickfire against Himachal, score 92 runs with 6 six & 6 fours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.