Virat Kohli's inspiration for fitness is Dinesh Karthik's wife deepika pallikal | ऐकावं ते नवलंच! दिनेश कार्तिकच्या पत्नीकडून विराट कोहलीने घेतली फिटनेससाठी प्रेरणा
ऐकावं ते नवलंच! दिनेश कार्तिकच्या पत्नीकडून विराट कोहलीने घेतली फिटनेससाठी प्रेरणा

 मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये सर्वात फिट कोणता क्रिकेटपटू असेल तर तो म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली. कोहली जेवढा वेळ व्यायामशाळेत व्यतित करतो, तेवढा कोणताही खेळाडू करत नाही, असे म्हटले जाते. कोहलीच्या फिटनेसची प्रेरणा कोण, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला असेल. आणि जेव्हा तुम्ही या प्रश्नाचे उत्तर ऐकालं तेव्हा तुम्हाला धक्का बसेल.

कोहली आणि दिनेश कार्तिक यांचे सूर जास्त जुळत नसल्याचे काही जणांना वाटते. पण कोहली आणि दिनेश कार्तिकची पत्नी यांचे चांगले नाते आहे. कोहलीच्या फिटनेसची कार्तिकची पत्नी प्रेरणास्थान आहे, असे समजले जाते.

भारतीय संघाला काही वर्षांपूर्वी शंकर बासु हे ट्रेनिंग द्यायचे. प्रत्येक खेळाडूने कसा आणि कोणता व्यायाम करावा, हे बासु ठरवत असतं. कोहलीलाही व्यायाम शाळेमध्ये बासु हेच ट्रेनिंग देत होते. बासु यांनी यावेळी कोहलीच्या फिटनेसचे प्रेरणास्थान कार्तिकची पत्नी असल्याचे सांगिगते आणि सर्वांनाच धक्का बसला.

बासु यांनी सांगितले की, " आयपीएलच्या सुरुवातीच्या २-३ मोसमांतील ही गोष्ट आहे. आम्ही भर उन्हात सराव करत होतो. त्यावेळी कोहलीने कार्तिकची पत्नीदेखील सराव करत असल्याचे पाहिले. यावेळी को कार्तिकच्या पत्नीपासून प्रेरित झाला. त्याने जेव्हा कार्तिकच्या पत्नीचा फिटनेस पाहिला तेव्हा तर कोहली अवाक् झाला होता. तेव्हा कोहलीने कार्तिकच्या पत्नीसारखा सराव करण्याचा प्रस्ताव सर्वांपुढे मांडला. त्यामुळे कोहलीच्या फिटनेससाठी कार्तिकची पत्नी आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल ही प्रेरणास्थान आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही." 

Web Title: Virat Kohli's inspiration for fitness is Dinesh Karthik's wife deepika pallikal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.