Virat Kohli wanders with his wife Anushka Sharma after losing the ODI series | वनडे मालिका गमावल्यानंतर पत्नीबरोबर भटकंती करतोय विराट कोहली
वनडे मालिका गमावल्यानंतर पत्नीबरोबर भटकंती करतोय विराट कोहली

भारताला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत ३१ वर्षांत प्रथमच ‘व्हाईटवॉश’ला सामोरे जावे लागले तर, न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव करीत मालिकेत ३-० ने सरशी साधली. भारतीय संघाला यापूर्वी १९८९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ५-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. एखादा पराभव झाला तर खेळाडू जास्तीत जास्त सरावावर बर देतात, पण भारताचा कर्णधार विराट कोहली तर पत्नी अनुष्का शर्माबरोबर भटकंती करत असल्याचे समोर आले आहे.

भारताला न्यूझीलंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. आता कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाने कंबर कसली आहे. पण दुसरीकडे पराभवानंतर भारताचा संघ मात्र सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे समोर आले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार नसल्यानं कसोटी मालिकेत सलामीला येण्याची संधी कोणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचं काम सुरू झालं आहे. पृथ्वी शॉ आणि शुबमन गील यांच्यात दुसऱ्या सलामीवीराच्या जागेसाठी चुरस रंगणार आहे.

ही सुट्टी एन्जॉय करत असताचे काही फोटो चांगलेच वायरल झाले आहेत. या फोटोमध्ये विराटच्या बाजूला अनुष्का दिसत आहे. अनुष्का शर्माने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पँट घातली आहे, तर विराटने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पँट घातली आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्काबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनीही दिसत आहेत.

बीसीसीआयनेही काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये भारतीय खेळाडूंचे तीन फोटो आहेत. कसोटी मालिका असल्यामुळे अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांचे संघात आगमन झाले आहे. भारतीय खेळाडूंबरोबर संघाचे प्रशिक्षकही या फोटोमध्ये दिसत आहेत.

Web Title: Virat Kohli wanders with his wife Anushka Sharma after losing the ODI series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.